पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२७ करून येतील तरी तलास करून घेऊन पाठवणे, त्यास मी आलिया- पासून बहुत यत्न केला. परंतु सात हाती शाला मिळत नाहीं. दिल्ली- कडून यंदा एवढें लष्कर आलें, परंतु शालांचा जिन्नस अणुमात्र आला नाहीं. दिल्ली मात्र नांव राहिले आहे. सावकार अगदर्दी बुडाला. यानेंकडून एक अगर जोडी शाल मिळतील तरी पाठवावयास अनमान मी करीत असेन, तरी स्वामींच्या पायाची शपत असे. धुवट शाला मिळतात. त्याही पांच साडेपांच हाती. कोरा माल अगदीं नाहीं. सेवेसी श्रुत व्हावें ह्मणून लिहिलें असें वरकड कितेक वृत्त विनंतिपत्र लिहिलें आहे. त्याप्रमाणें चरणरजावरी कृपाळू होऊन लोभाची वृद्धि करणार स्वामी समर्थ असेत. हे विज्ञापना. [ लेखांक ३६१ ] भार्गवराम. श्रीमत् भृगुनंदनस्वरूप तपोनिधि महाराज श्री परमहंसबावा स्वामी स्वामींचे सेवेसीः– सेवेसी चरणरज राघो बल्लाळ चरणावरी मस्तक ठेवून शिर सा० नमस्कार विनंति. येथील कुशल आषाढ शुद्ध ६ पर्यंत स्वामींचे आ- शीर्वादें शहादाडा यास सुखरूप असे विशेष. स्वामींनीं सावजी जासूद याजबराबर आशीर्वादपत्रे पाठविलीं तीं मजला आषाढ शुद्ध प्रतिपदेस पावोन बहुत समाधान जाहले. जासुदास बरें वाटत नव्हतें ह्मणोन आपले घरीं पडोन दोन महिने राहिला होता. यास्तव पत्रे पावली नव्हतीं. हल्लीं पत्रामध्यें आज्ञा जे, एक शूद्री मागें बक्षीस केली आहे पाठविली. सईचे माथां रुपये ठेविले आहेत हे पाठवून देणें. न पाठविलेस तर कोप होईल ह्मणोन रागेरोन लिहिलें तरी शूद्री सरकारांत राहत होती. तिजला ठेविली असती आणि एक वर्ष अधीच मुशाहिरा देणें. निमें मुशाहिरा नजर कां हे तरी स्वामींची आज्ञा -