पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२६ - या उभयतांस वस्त्रे व हत्ती दोघांस दोन देऊन सोडिलें हें वर्तमान रा० बाजीराव प्रधान यांचे कागद महाराजास जेजुरीचे मुक्काम आले व रा० बापुजीपंत नाना यांणीं सांगितले, त्यावरून सेवेसी लिहिलें आहे. यानंतर वाडियाचीं लांकडे आलीं येणेंप्रमाणें: – १८ खांडे, १७ खांब, १८ पाटस यास ओंडे. एकूण त्रेपन्न लांकडें आलीं. शेवेसी श्रुत होय. रा० नानाकडील कागदलाखोटा व करंजगांवाहून लाखोटा ऐसे दोन लाखोटे सेवेसी रवाना केले आहेत. घराचें काम चालीस लाविलें आहे. घर कवलार बांधतो... राणोजी चौगुला मृत्यु पावला. सेवेसी कळले पाहिजे हे विज्ञापना. [ लेखांक ३६० ] श्रीभार्गवराम. श्रीमत् भृगुनंदनस्वरूप तपोनिधि महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- - सेवेसी चरणरज राघो बल्लाळ चरणावरी मस्तक ठेऊन शिर सा० नमस्कार विनंति. येथील कुशल फाल्गुन वद्य ५ पर्यंत स्वामींचे आशी- र्वादें बन्हाणपूर शहादाडा येथें सुखरूप असों विशेष स्वामींनीं कृपा करून तुकोजी जामुदासमागमें आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन आनंद पावलों राजकी प्रसंगामुळे बहुतशी काळजी प्राप्त जाहली होती. परंतु स्वामींच्या आशीर्वादें श्रीमंत राजश्री नाना पंत प्रधान यांचा सवाई नक्ष जाहला. तेणेंकडून सर्व संकट निवारण जाहलें. सर्व प्रताप स्वामींच्या आशीर्वादाचा असे. कोणेंविशीं चरणरजास चिंता वाटत नाहीं. श्रुत होय. यानंतर स्वामींनीं जिनसाविर्शी आज्ञा केली, त्यास यंदा कापडाची जात सवाईनें महर्ग आहे. तशांहीमध्यें चौकशीनें जिन्नस घेऊन पाठविला असे. त्याची यादी अलाहिदा तपशीलवार असे. त्यावरून विदित होईल. शालांचे विषयीं स्वामींनीं मजला दोन तीन वेळां निरवण केलीच होती जे, सात हाती शाला हातास यत्त्रे- ●