पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२५ [ लेखांक ३५८ ] श्री. - श्रीमत् महाराज राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बापुजी गणेश चरणावर मस्तक ठेवून शिर सा० नमस्कार विनंति. येथील वर्तमान ता० छ० ४ जिल्हेजपर्यंत वर्तमान श्रीमंत राजश्री दादा यांजकडील वर्तमान हर्षाचें आलें तें राणोजी चव्हाण याजबरोबर पाठविलें. सा घटका रात्रीस राजश्री दादोबा कांगोरीस गेले आहेत. राजश्री प्रतिनिधींचें त्यांहीं लिहिले आहे कीं सुलतान ढवा करून जंजिरा राजश्री प्रधानपंतीं शिड्या लावून लगट करून घेतला. ऐसें राजश्री स्वामींस लिहिले आहे. शंभर हवशी मारिले. एकास बेडी घातली आहे. एक ठाणपेयानें उभयतांहीं मारिला ऐसे वर्तमान आलें आहे. राजश्री राऊ यांचें पत्र आलें नाहीं. येईल तेव्हां खरें ऐसें ह्मण- तात. स्वामींचे आशीर्वादेंकरून कार्य जाहलें, तर स्वामींचा प्रताप थोर आहे. जासूद येणार आहे. तर आले ह्मणजे हर्षाचें वर्तमान पाठवितों. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. · [ लेखांक ३५९ ] श्री. श्री सकल तीर्थस्वरूप बावा स्वामींचे सेवेसी:- - - चरणरज जिवबानें दोनी कर जोडून चरणावरी मस्तक ठेवून शिर- सा० नमस्कार विज्ञापना ऐसीजे: - स्वामींची आज्ञा कीं, तंबाकू पाठवणे. आशेवरून तंबाकू ठकबंदी शेर मण चाळीस शेरी प्रमाणें वजन ४३॥४ साडेतीन मण चार शेर सेवेसी पाठविली आहे. वरकड लष्करचें वर्तमान तरी रा० बाजीराव प्रधान नर्मदा बावापिराच्या घांटें उतरोन अलीकडे आले. त्यांचे मागें दाभाडे यांच्या फौजा आहेत व पुढें यांच्या सा गांवच्या अंतऱ्यानें किलीजखान व बंगस आहेत. यांचा त्यांचा हर्षामर्ष होणार आहे. उदाजी पवार व चिमणाजी दामोदर १ जिवबा खासनीस:- पेशव्यांच्या खाजगींतील नौकर.