पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२४ [ लेखांक ३५७ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः- चरणरज बापुजी गणेश चरणावर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नम- स्कार विनंति. येथील वर्तमान स्वामींचे आशीर्वादकरून पौष वद्य चतुर्दशीपर्यंत स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष. राजश्री बाबुराव मल्हार यांहीं स्वामींच्या द्रव्याच्या हुंड्या अवरंगाबादेहून सा- तारच्या सावकारांवर करून पाठविल्या आहेत. येणेंप्रमाणे रुपये:- - ५०० माणकोचा नाईक पाठक. २६०० त्रिकमशेट गुजर राजापूरकर. १९०० नारोबा नाईक अनगळ हुंड्या दोन. - एकूण पांच हजारांच्या आल्या आहेत. आजपासून रुपये नववे दिवश त्याजपासून खरें करून पेठचालीचे घ्यावे. तर स्वामीनें कृपा करून खत काढून खताचा हिशेब व्याजाचा करून, गोविंदपंतास नाहीं तर हरकोणास पाठविले पाहिजे. व्याजाचे रुपये होतील ते हिशेब करून वारून देऊं. पुढें स्वामींचे रुपये वृद्धीस लावणें तर त्या गोष्टीची फिकीर थोडकीच आहे. पुढे हंगाम येईल तेव्हां स्वामींस विनंति करूं. परंतु पैका आला तो घ्यावा. ही गोष्ट उत्तम आहे. स्वामींचें पत्र राजश्री बाबूराव यांस पाठविलें होतें. परंतु त्यांच्या हुंड्या अर्धीींच अवरंगाबादेच्या आल्या. त्यांहीं स्वामींस विनंति लिहिली आहे. तेही पुढे कांहीं स्वामींच्या पायाशीं चुकतील ऐसें नाहीं. परंतु आला पैका तो घ्यावा ही गोष्ट उत्तम आहे. स्वामीनें हिशेब करून व्याज ठरावून खत पाठविले पाहिजे. सेवेसी श्रुत होणें. शके १६५३ हे विज्ञापना. १ पौष्य वद्य चतुर्दशी:- ता. १५ जानेवारी इ. स. १७३२ रोज शनिवार.