पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२३ ● •याजबराबर आज्ञापत्र पाठविलें तें पावलें. मातुश्री लक्ष्मीबाईचें पत्र पाठ- विलें तेंही वाचून पाहिलें. तें फिराऊन मांगे पाठविलें असे. त्यांहीं अतिशयें स्वामींचा आहे ऐसें लिहिले आहे. स्वामी आपल्या यत्नास कांहीं चुकत नाहीं. आमची पुण्यसामग्री थोडकी, तेथें उपाय काय आहे? “जे गोष्टीनें मोती फुटे ती गोष्ट कार्याची आहे ऐसी नाहीं. त्यांहीं अतिशयें त्यासी ल्याहावें ऐसें नाहीं. इतला करावा तो गौरवें करून करावा. राजा आहे तो कष्टी करूं नये. ईश्वर बरें हाणत नाहीं. दुराग्रह करून गोष्ट सिद्धीस गेली तर बरें, नाहींतर गोष्ट कठीण आहे. राग मनांत घरून पक्का ध्यानास होऊं शके." पत्र वाचून पाहतां को- टील गोष्ट कोठें लागत्ये ऐसें वर्तमान आहे. स्वामींस मीं पामरानें ल्या- हावें ऐसें नाहीं. आपल्या चित्तास येऊन रहस्य राहोन कार्य जाहले तर करावें. नाहींतर दुराग्रह करूं नये. स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांस राजश्री स्वामींचें पत्र बोलावणे काल प्रहरा दिवसास येथून रवाना जाइले आहे. आर्धी पत्र न वाचणें, घोड्यावर बसावें मग पत्र वाचावें. ऐसींच पत्रे गेलीं आहेत. तेही लव- करच साताऱ्यास यावें ऐसें आहे. स्वामींस कळावें ह्मणून सेवेसी लि- हिले आहे: सोयरिकीचे विसीं स्वामींस विनंति लिहिली आहे. तेथे स्वामींनीं पर्यायें लिहिलें तर स्वामींनीं सर्वस्वें माझा अंगीकार केला आहे. मायबाप, गणगोत स्वामी ऐसें मनःपूर्वक चित्तांत आणून वि नंति लिहिली आहे. आपले त्याचें संभाषण जाहलें नाहीं. स्वामी ह्मण- तील तर याउपर पत्र पाठवूं. अद्यापि आपण लिहिलें नाहीं. बोली- चाली रुबरु जाहली नाहीं. ऐसें वर्तमान आहे. स्वामींच्या चित्तास येईल ती आज्ञा करावी. स्वामी आपणावर दया करूं लागले त्याजपा- सून हब (सर्व ?) लोक बरें ह्मणों लागले. ऐसें मनःपूर्वक दिसोन येतें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. .