पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२२ मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विज्ञापना ऐसीजे: - स्वामींनीं आशी- र्वादपत्र पाठविलें तें पावोन सनाथ जाहलों. तेथें आज्ञा केली कीं, आ- झांस खालें न्यावयाचे चित्तांत असेल तर, पेढें, आंबडस, नाइसी, कळंबुसी, धामणी, सोनगांव एकूण सा गांवच्या सनदा आणवून पा ठवून देणें, ह्मणून आज्ञा केली. ऐसियासी चरणरज स्वामींचे चरणा- जवळ आलो होतों तेव्हां, "पुरातन खानाचे कारकीर्दीस चार गांव इनाम चालत होते त्या गांवच्या ताज्या सनदा हुजूरच्या आणून पाठवणें; मग हे सुभेदार खुद्द दौलत करूं लागतील तेव्हां दुसरें इनाम गांव देतील तें देऊत" ह्मणून आशा केली. त्याप्रमाणें आलीं आजम सिद्दी याकूत सुभेदार यांस पत्र लिहून स्वामींचें त्यांस पत्र होतें तें देखील त्याकडे रवाना केलें असे. त्याप्रमाणे चार गांवच्या ताज्या सनदा येतीलच. हह्रीं धामणी सोनगांव दोन गांव नवे इनाम करून देणार, तरी स्वामींहून हबशी यांस दोन गांवची हिशाब बहुतसी आहे ऐसें नाहीं. तेही गांव सिद्दी याकूतच करून देतील. हल्लीं स्वामींचें पत्र आलें हेच बजिन्नस त्यांकडे रवाना करून दोनी गांवचे इनाम सनदांविशीं लिहितों कोंकणचें ऊर्जित होय ऐसा स्वामींनीं आशीर्वाद दिल्हा पाहिजे. स्वामींचा पूर्ण आशीर्वाद जाह- लियानें तो भार्गवच आपले राष्ट्र मामुरी (?) करील. सेवकही खा गेलियास नवे दोन गांवचे विसीं सिद्दी याकूत सुभेदार यांजवळ बो- लावयाचें तैसें बोलोन, स्वामींचे पूर्ण आशीर्वादेंकरून धामणी सोनगांव- ही इनाम होतील. विदित जाहले पाहिजे. हे विज्ञापना. ● [ लेखांक ३५६ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बापुजी गणेश सा० नमस्कार विनंति येथील वर्तमान ता० १२ सवालपर्यंत यथास्थित असे विशेष स्वामींहीं महादजी हरकारे --