पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२१ त्यास राजश्री दमाजी गायकवाड हे सोनगडास आलेयावर माहे ज्येष्ठमास माणसें पाठवावीं. हुजरोन महाराजास राजश्री यशवंतराव व राजश्री जिऊचा चिटनवीस यांणीं फिरोन रदबदली केली. महाराजांनी मान्य केलें कीं जैसे श्री बावा ह्मणतील तैसे कागदपत्र हातरोखे देणें. परंतु गायकवाड याचें आपणास बरें करणें जरूर आहे. दाभाडी तापी- तीरास होती. त्याणें कदमास घसघस लाविली होती. त्यास कंठाजी कदम आपले फौजेनिशीं राजश्री चिमाजी आपा बरोबर गेले. तेही दाभाडियाच्या पदरींहून गेले, आणि दाभाडे कोणीही दरबारीं येत नाहींत. शेवट लागेल तो पहावा. त्यास आपण तो सर्वप्रकारें आज्ञांकित असों. यानंतर हबशी याकडील येथें वकील आला आहे. त्यास आपण राजश्री यशवंतराव व राजश्री जिऊबा यांस वर्तमान सविस्तर श्री भा र्गव चिपळूणचे सांगितले. त्याजवर उभयतांनीं कबूल केलें कीं, जैसी बाबा आज्ञा करितील त्याजप्रमाणे ह्वशी यास कागदपत्र पाठवून कौल करार राजपुरीहून आणवितों अंजनवेलीकर व गोवळकोटकर यांसही ताकीद जैसी पाहिजे तैसी करितों. तसें हबशी याकडील वकिलांनी ( वकिलास ?) सर्व उभयतांनीं क्रियापुरस्सर त्यास सांगितले. त्याणे मान्य केले. त्यास हैं वर्तमान स्वामींच्या सेवेसी कळावें ह्मणून लिहिलें असे. त्यास जर कांहीं स्वामी आज्ञा करितील तर त्यास येऊन निरोप जाइलियावर समागमें माणूस देऊन स्वामीकडे पाठवून देऊं नाहींतर आपणास आज्ञा होईल तर आपण त्यास घेऊन सेवेसी येऊं तमाम चिपळोण तर्फेस कौल दिल्हा. याजकरितां सविस्तर अर्थ सेवेसी लि हिला. जैसी स्वामी आज्ञा करितील त्याजप्रमाणें वर्तणूक केली जाईल. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना. [ लेखांक ३५५ ] श्री. तीर्थसमदर्शन श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें चरणरज कृष्णाजी नरहरी दोनी कर जोडून चरणावरीं २१ -