पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ , हिशेब करून स्वामीकडेस बार्की निघेल तें स्वामींस कळलीच आहे. गोठ- ण्याचा मजकूर तरी, भटास दिली ओसरी तों भट पाय पसरी, हा लेख जा 'हला. असो. स्वामीपेक्षां आम्हास विशेष काय आहे? गोठण्याची सनद पाठ विली आहे. " ह्याप्रमाणे कान्होजी आंग्रे ह्यांनी स्वामींस विनोदाचं उत्तर लिहून गोठणें गांवाची सनद पाठवून दिली. ही सनद आम्हांस मिळाली नाहीं. तथापि का न्होजी आंग्रे ह्यांनीं गोठणें गांव श्रीमत् परमहंस गोसावी यांस ॥ सन तिस्सा अशरीन मया व अलफ छ० २८ सफर रोजी इनाम दिल्याबद्दलचा उल्लेख प्रतापजी काळे नामजाद जंजिरे विजयदुर्ग ह्यास लिहिलेल्या एका ताकीद- पत्रांत आहे. त्यावरून वरील पत्र व गांवची सनद हीं ता० २२ सप्टेंबर ३० स० १७२८ ह्या एकाच तारखेचीं आहेत असे दिसून येतें; व गोठणें गांव स्वामींस इ० स० १७२८ च्या अगोदर मिळाले नाहीं हे सिद्ध होतें. स्वामींनी देशावर येते वेळी कान्होजी आंग्र्याचा निरोप घेतला व त्याज कडून कान्होजो भोंसले व नारायणभट (हे प्रसिद्ध नारायण दीक्षित काय- गांवकर असावेत) ह्यांस पत्रे घेतली. स्वामी इकडे येण्यास निघाले, त्या वेळीं कान्होजी आंग्रे यानें “स्वामींनीं ते प्रांतीं जावून सर्व जनांचा उद्धार करून पुन्हां आगमनाचा विचारही अविलंबेंच केला पाहिजे" म्हणून आपली इच्छा प्रदर्शित केली. त्यावरून स्वामींविषयीं आंग्याची भक्ति व स्वामींचा १. 'ग्रंथमाला'–'मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.' लेखांक १७९ ह्यामध्ये हे पत्र प्रसिद्ध झाले आहे. स्वामींचा व आंग्र्याचा जो दृढतर संबंध होता, त्या- वरून ह्यांतील मजकूर विनोदाचा असावा असे वाटतें स्वामीसारख्या अंतर्यामी पूर्ण वैराग्य बाणलेल्या पुरुषास कान्होजी आंग्र्यानें वेदांत शिकवावा असा अर्थ नव्हता. कारण स्वामींचा जो लोभ होता तो स्वतःकरितां नसून केवळ जगाच्या कल्याणाकरितां होता है उघड आहे. तेव्हां हा विनोदाचाच प्रकार असला पाहिजे. तसा प्रकार नसता तर शेवटी “स्वामीपेक्षां आह्मांस विशेष काय आहे ?" असे टयून गोठण्याची सनद कान्होजीनें पाठविली नसती. विनोदाचा प्रकार नसेल तर कदाचित् रागानें किंवा त्रासानेही तर्से लिहिणे संभवनीय असूं शकेल. ३