पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२० व गुन्हेगारी हजार बद्दल पाठविले. ऐशास आझीं तो स्वामींची लेकरें आहों. सर्व अन्यायी आहों. परंतु आपले समर्थानीं ह्मणविलें, एक- वेळ कृपाळू होऊन आशीर्वाद आह्मांस दिधला, तेथें समर्थापासून इत राजी कदापि होणार नाहीं. दुसरें, आपले रुपये कांहीं मोबदला करून उदीम करावा ऐसें नाहीं. येथें दंगा मोठा जाला होता. तें सविस्तर वृत्त कळलेच असेल. सांप्रत अवघें सुरळीत जालें. दिवाळीच्या मुहूर्ते गायकवाड वारीस जातात. मातुश्रीही स्वार होऊन त्यामार्गे येतात. यांचे सोबतीनें रुपये बैलावर घालून, माणसें आपलीं देऊन, रुपये देतों. पावते करितों. वारंवार माणसें पाठवून आह्मांवर इतराजी करून आ मचा उपहास करावा ऐसें नाहीं. आपली ठेव रुपये आह्मांजवळ आहे. देतों. आझांस जरूर काय आहे ? परंतु हुंडी ही येथून होत नाहीं. कदाचित् करावी तरी एक हुंडी फिरून आली; आपण शब्द लाविला; यास्तव भयभीत आहों. सारांश, ऐवज उमाबाई पदरीं घे- तील तरी त्यांचे (पदरीं) घालं. अगर न घेत तरी आह्मी पावते करूं. अंतर कदापि होणार नाहीं. आणि उगीच माणसें आपण पाठवितात. तीं कांहीं पदरीं रुपये घेत नाहींत. यास आझीं काय करावें ? दुसरें गु- न्हेगारीची गोष्ट आपण लिहिली तरी सर्व अन्यायी आहों. आज्ञा कराल तें प्रमाण आहे. हे विज्ञापना. [ लेखांक ३५४ ] श्री. श्रीमत् सर्व तीर्थस्वरूप परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः– अपत्ये चरणरज नारो विठ्ठल प्रभु कृतानेक विज्ञापना. येथील वर्त- मान ता० चैत्र शुद्ध नवमी पर्यंत मु॥ उंग्रेड येथें स्वामींच्या कृपादृष्टी- करून सुखरूप असों विशेष स्वामींनीं पत्र पाठविलें होतें व रुद्राजीपं- तांनींही कितेक विचार सांगितला. त्याजवरून माणूस न पाठविलें.