पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१९ ● समस्त गंगातीरीं करजगावीं सुखरूप असो. आपले अभयपत्र पिंपरी त्या परवादी [१] यांबराबर आलें तें पाहोन परम आल्हाद झाला. मा- ह्याळसाबाईची माय येथें आली होती. त्यास गंगास्नान करून उभयता या प्रांतास आहेत. आपले दर्शनास येतील. तीर्थरूप रा० दिवाजी पंता- कडील मनुष्य सांप्रत कोणी घरचे आले नाहीं. गुजरात प्रांतीं उभयता सैन्यें आहेत. चैत्र शुद्ध ६ गुरुवारी रा० प्रधानपंतासी व सेनापति यांसी युद्ध जालें. सेनापतीकडे अवंदा उदाजी पवार गले होते. त्यास युद्ध जालें. त्रिंबकराऊ दाभाडे व मळोजी पवार युद्धांत कामास आले. आणखी कितेक लोक याकडील जखमी जाले. प्रधानपंताकडील नारायणजी ढमढेरें व आणखी कितेक युद्धांत पडिले. कितेक जखमी जाले. उदाजी पवार व चिमणाजी दामोदर पाडाऊ प्रधानपंताकडे आलें. ऐसें वर्तमान रा० सेनापतीकडील जासूद या मार्गे गेले, त्यांनीं सांगितले. आणखी कितेक लोकांचीं पत्रे आली. परंतु आमचे माणूस अद्यापवर आले नाहीं. रा० आनंदराऊ पवार व शिवाजीपंत स्वामींच्या कृपेंकरून सुखरूप आहेत. थोडियाच दिवसांत कागदपत्र येती, व तेही येती. “खंडोजी रेवा उतरोन दक्षिण तीरास नंदुरबारेकडे आला; व प्रधानपंत रेवा उतरोन अंकलेश्वरावर आले." हें वर्तमान आजि आले आहे. उभयतां सैन्यें थोडियाच दिवसां या प्रांतांत येती. तीर्थ- रूपांचे कागदपत्र आलियावर स्वामींकडे मुजरत माणूस पाठवू. कोणे विषयीं चिंता न कीजे. सदैव पत्र पाठवून बाळकाचा सांभाळ करीत गेले पाहिजे. कृपालोभ असों दीजे हे विनंति. [ लेखांक ३५३] श्रीएकनाथ समर्थ. श्रीमत् महाराज श्री भार्गवराम बावा स्वामींचे सेवेसी:- विनंति चरणरज अंताजी नाईक गुंडे कृतानेक सा० नमस्कार विनंति उपरी स्वामीनें तुकोजी पाटील माळशिरसकर रुपये पांच हजार -