पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१८ आहे. त्यास यादो सजणाजी स्वामींसही विदित आहेत. आणि आमचे विदंडकीं पुरातन आहेत. तरी कृपा करून त्यांची सुटका होय तें केलें पाहिजे. पूर्वी महद्यशें शतशा स्वामींच्या आज्ञेनें जालीं आहेत. तेथें हें काम स्वामींस अगाध आहे ऐसें नाहीं. येविसीं विनंतिपत्र राजश्री जगन्नाथपंत यांणीं लिहिले आहे. त्यावरून विदित होईल. तरी विनंति उदास केली न पाहिजे. बहुत काय लिहिणें ? मशारनिल्देस कबिलेसुद्धां घाटावरी पाविलें पाहिजे. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. [ लेखांक ३५१ ] श्री दत्तात्रेय. तीर्थस्वरूप श्री परमहंस अवतंस श्रीस्वामी स्वामींचे सेवेसी:- - शिष्यांतर्गत देवराव मेघ:शाम कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता० छ० जिल्कादपर्यंत स्वामींच्या कृपालोकनें- करून यथास्थित असे. आशीर्वादपत्र पाठविलें तेथें आज्ञा केली कीं, मौजे राजुरी व मौजे दुधडवाडी हे दोन्ही गांवच्या निर्वेध सनदा रा- जश्री छत्रपतीकडून करून देणें; बहुत श्रेयस्कर आहे; ह्मणून कित्येक प्रकारें आज्ञा केली. ऐसियासी स्वामींची आज्ञा सेवकांस प्रमाण. शिरसा वंदन करून राजश्री छत्रपतींस विनंति केली. त्यास राजश्री छत्रपति बोलिले कीं, राजश्री पंतप्रधान यांची समजाविसी जाली झणजे सर्व कार्यों होतील. येविर्सी कालही सेवेसी लिहिले आहे. वारंवार राजश्री छत्र- पतींस स्मरण करून देत आहों. कोणेविसीं सेवेसी अंतर पडणार नाहीं. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना. [ लेखांक ३५२ ] श्रीभार्गवराम. श्रीमंत परमहंस स्वामींचे सेवेसी:-

-

विद्यार्थीि देवाजी यशवंतराव व रंगनाथ शिवाजी व सौ० गंगा- बाई कृतानेक सा० नमस्कार विनंति उपरी ता० वैशाख शुद्ध ३ पावेतों