पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१७ [लेखांक ३४९] श्री. श्रीमंत महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज गोविंद काशी कृतानेक साष्टांग विज्ञापना ता० छ० १५ जिल्कादपावेतों स्वामींचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथा- स्थित असे विशेष. श्रीमंत राजश्री नाना स्वामींनीं व्याजाबाबत सालम- जकूरचे रुपये २००० दोन हजार देविले. उत्तम पारखून, निशाणे घो- टून, थैल्या भरून, लाखोटे करून, राणोजी कदम वगैरे माणसें चौकीचे माणसांबरोबर पोतांपैकीं सदहु दोन हजार रुपये पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर पाठवायास आज्ञा केली पाहिजे. विदित जाहलें पा हिजे, सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ● पै० छे० १५ जिल्काद सन तिस्सा सलासीन रुपये २०००. [ लेखांक ३५० ] श्री दत्तात्रेय. श्रीमत् सकलतीर्थरूप महाराज राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - - आज्ञाधारक सेवक देवराव मेघ:शाम कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता० चैत्र शुद्ध प्रतिपदा जाणोन स्वकीय लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. स्वामी घाटाखालें श्रीच्या दर्श- नास गेले. कोणे स्थळीं आहेत हें वर्तमान कळत नाहीं. तरी आशी- र्वादपत्रीं विस्तारें लेखन करवून सनाथ केले पाहिजे. विशेष यादव सजणाजी प्रभु सबनीस शामलाचे तर्फेनें अंजनवेलीस होते. त्यास अंजनवेल राजश्री तुळाजी आंगरे यांणीं फत्ते केली ते समयीं यांचें वस्त्रहरण जालेमुळे मनुष्ये सुद्धां कैदेत आले आहेत. ऐसीयास रा० केसोपंत यांणीं रुपये पावणेचारशें खंड करार करून विपत्य मोडिली १. छ० १५ जिल्कादः -- ता० १४ फेब्रुवारी ३० स० १७३९.