पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१६ श्री. श्रीमत् परमहंस भार्गवरामबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज विसाजी गणेश व काशी नानाजी दिंमत राजश्री यश- वंतराव पवार मुक्काम कविठे कृतानेक सा० नमस्कार विनंति. येथील कुशल स्वामींचे कृपावलोकनेंकरून भाद्रपद वद्य चतुर्थी यथास्थित असो. यानंतर स्वामींचें कर्ज रा० यशवंतराव पवार यांजकडे आहे. त्यांचें पत्र आह्मांस आलें कीं, आह्मी दूरदेशीं छावणीस सवाई जयसिंगापास राहिलों. स्वामींचे कर्जाचा निकाल जाला पाहिजे. कर्जाचे स्मरणही नसेल ह्मणोन कोप होईल. याकरितां नासिकांत एका साहुकाराचें कर्ज काढून आझांस पत्र लिहिले की, पैका स्वामींस प्रविष्ट करणे आणि त्यांचे आशीर्वादपत्र आह्मांस पाठवणे. त्यास नासिकप्रांतींहून पैका याव- यासी वाटेची धामधूम प्रस्तुत आहे. पैका कैसा येईल हें संकट. दुसरें, साहुकाराचें व्याज चालतें. ये गोष्टीचा विचार पडिला ह्मणून स्वामींस विनंतिपत्र लिहून पाठविलें असे. गतवर्षी वर्ताळा मात्र स्वामींनी केला होता. त्याप्रमाणे यंदां वर्ताळाच घ्यावयाचे असेल तरी तितकाच साहुका- रापासून आणून स्वामींस प्रविष्ट करूं, स्वामी ह्मणतील कीं, अवधा पैका आणवणें. तरी धामधुमेचा निर्गम आठांचवदिवसांचा विचार यांतून ऐवज आलियावर पाठवून देऊं. आझी स्वामींचे चाकर ठेवणाईत. जैसी आज्ञा कराल तैसी वर्तणूक करूं. राजश्री यशवंतराव पवार तु- मच्या आशीर्वादें पुष्करावर संवाई यांसी छावणी करून सुखरूप आ हेत. ज्या कार्यास गेले होते तें कार्य धोकळसिंग व सवाई जयसिंग यांचा सल्ला जाला. यश आलें. सर्व प्रताप स्वामींच्या आशीर्वादाचा आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ३४८ ] १. सवाई:- सवाई जयसिंग जयपूरकर राजे. - -