पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांस लिहोन स्वामीकारणें जिन्नस आणविला होता, तो त्यांनीं येथें आणिला. येथून सांप्रत सेवेसी पाठविला आहे:- - ४५ दाळिंवें सुमारें. ३० साखरनिंबें ७५. ७५ ३१५ [ लेखांक ३४७] ८४६ गोराडी वजन पकें. ८८ ॥ सुरण कंद. ८८६ ।।। एकूण दाळिंचें व साखरनिंवें पाऊणशे व वजन पके पावणेसात शेर बकाजी शिंदा यास समागमें भोयांवर देऊन सेवेशी पाठविलें आहे. प्रविष्ट जाहलियाचें उत्तर पाठवावयास आज्ञा केली पाहिजे. स्वामींचा मुक्काम पिंपरीस किती दिवस आहे, तेथून जाणे कधीं होईल, हैं लेहोन पाठवावयास आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत झालें पाहिजे हे विज्ञप्ति. श्री. श्रीमत् परमहंसस्वामी भार्गवरामबावा यांचे सेवेसीः- चरणरज विसाजी गणेश व काशी नानाजी दिमत यशवंतराव पवार सा० नमस्कार विनंति स्वामींनीं आज्ञापत्र पाठविलें कीं, राजश्री यशवंतराव पवार यांजकडे कर्ज आहे. तें यंदांचे ठेविले वर्ताळियाचे रुपये १५०० पंधरारों व व्याजाचे व कारकुनाचे रुपये दीडशें सदरहु साडेसोळाशे पाठवणे. आज्ञेप्रमाणे रुपये साडेसोळाशें आजि प्रातःकाळीं आश्विन शुद्ध अष्टमी मंगळवारीं धावडशीस स्वामींस पत्र लिहून खाना केले. तों आज दो प्रहरां श्रवण जाहलें कीं, स्वामींचें आगमन वाघोलीस जाले आहे. रुपये पाठविले हें स्वामींस श्रवण व्हावें याजकरितां पत्र पाठविलें असे. आझांस पुणियाचें बोलावणे आले आहे. आजि भोजनोत्तर अथवा पहांटेस जाऊं. विदित जालें पाहिजे. हे विज्ञापना. -