पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१४ येसजी गायकवाड बाबाजीचा भाऊ याजविशीं स्वामींनी लिहिलें, ऐशास येसजी प्रस्तुत चाकर होत नाहीं. दसरियास दहा वीस माणूस घेऊन येऊन चाकर होईन ह्मणतो. यास्तव आतां चाकर ठेविला नाहीं. पुढें लोकसहवर्तमान आल्यावरी चाकर करून चालविले जाईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक ३४४] श्री. पुरवणी श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - विज्ञापना. आमचे शरीरों अनारोग्य प्राप्त होऊन व्यथा अतिशयेसी जाहली. या व्यथेसारिखी व्यथा कर्धीही जाहली नाहीं. मरणांतिक अ वस्था जाहली होती. प्रस्तुत स्वामींचे आशीर्वादेंकरून व्यथेस उतार आहे. स्वामींचे सेवेसी विदित व्हावें यास्तव लिहिलें असे. हे विज्ञापना. [ लेखांक ३४५] श्री. पुरवणी श्रीमत् महाराज परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः ● विज्ञापना. सेवकाचे शरीरी देवीची पीडा प्राप्त जाहली आहे. त्यास प्र स्तुत फोड्या पाण्याने भरल्या व किंचित् उतारही पडिला आहे. या उपरी स्वामींचे कृपेंकरून आरोग्यही होईल. स्वामींचे सेवेसी अवगत व्हावें यास्तव लिहिर्ले असें, सेवेसी श्रुत जार्ले पाहिजे हे विज्ञापना. हे इतर लोक. श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- [लेखांक ३४६] - - चरणरज बापुजी श्रीपत कृतानेक नमस्कार विनंति. येथील फा- ल्गुन बहुल द्वादशी गुरुवासरपर्यंत स्वामींचे कृपावलोकनेंकरून यथा- स्थित असे. विशेष राजश्री पंतप्रधान यांनी गंगाजी मल्हार व दादाजी