पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१३ विदित होईल. स्वामींनीं लग्नाचे साहित्यांतील कस्तुरी, केशर व गुलाब शिसे पाठवावयाची आज्ञा केली. त्यावरून कस्तुरी तोळा १, केशर तोळे २ व गुलाब शिसे २ सेवेसी पाठविले असेत. कस्तुरी केशर उत्तम नाहीं. सामान्य आहे. स्वामींस लग्नाचीं वस्त्रे १ शालजोडी, १ किनखाप, १ टोपी मखमालीची एकूण तीन पाठविली असेत. कृपा करून अंगीकार केला पाहिजे. उत्तर पावलियाचें पाठवावें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ३४३] ● श्री. -- पुरवणी श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति उपरी स्वामींनीं आज्ञा केली त्याचें उत्तरः- माळशिरसक राविशीं राजश्री बापुजी श्रीपत यांस सांगोन दीड हजार रुपये खंड ह्मणोन आज्ञा केली. ऐशास तुकोजी पाटील यांची मुलें व बका माळी यांस किल्ल्यावरी ठेविलें आहे. हल्लीं आशेप्रमाणें खंडाचाही तगादा केला असे, व संभाजी यादव यासही आणविला आहे. खंडाचा नि- काल करून घेऊं, तेव्हांच त्यास निरोप देऊं. नाहींतरी स्वामींच्या आ शेवेगळा त्यास निरोप देणार नाहीं. बाबाजी गायकवाड वगैरे लोक धारावीस मेले. त्याजविशीं स्वामींनीं लिहिलें. ऐशास त्यांचें तथ्य वर्तमान जीवंत आहेत कीं मेले ऐसें कळत नाही. परंतु बहुधा मेलेच असतील. त्या लोकांच्या बालपरवेशा करार करून देऊं. चालवावयास अंतर होणार नाहीं. मोत्यांचे पंचवीस दाणें पाठवून देणें हाणोन स्वामींनीं आज्ञा केली. त्यांतून मोत्यें दाणें २५ पंचवीस हस्तें कानोजी यादव जासूद पाठविलीं आहेत. घेतली पाहिजेत. साकर बुरा वजन पके शेर तीन मण सातारेयाहून देवणें ह्मणोन आशा केली. त्यावरून तीन मण बुरा सातारेयाहून देविली असे. प्रविष्ठ होईल.