पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ हिले स्वामींनी आज्ञा केली होती. सांप्रतही विस्तारें लिहिलें. स्वा- मींचे आज्ञेपेक्षां अधिक काय आहे ? यास्तव हशमांत कोणतीही तैनात कबूल केली. लोकांच्याही माणूस पाहून केल्या. गांव राहावयास भलता नेमून देतो. खुद्द फिरंगी याची गडबड आहे. यास्तव लो- कांची भरती पाहिजे. ह्मणून भलते जागा, जेथें झुंजावयाचें काम असेल तेथें पाठवितो. गड- बड वारली लणजे हवालाही यो- जिला जाईल, तसें सांगत होतो. परंतु वे गोष्ट त्यांनीं अमान्य करून सेवेसी आले आहेत. याउपर स्वामींचे विचारास येईल तें करावें. मींनीं चरणरजास निरोप धाव- डशीहून देतेसमयीं एकांतीं स्वमुखें सांगितलें तो अर्थ ध्यानांत आहे. त्याप्रमाणें वर्तणुकेस अंतर हो- णार नाहीं. वरकड त्यांचे चालवा. वयास अंतर होणार नाहीं. एत- द्विषयीं वारंवार स्वामींनीं लिहावें ऐसें नाहीं. ● स्वामी कृपा करून वरचेवर शिकवणुकेस्तव राग दर्शवून लि. हितात, तरी स्वामींचे चरणांवेगळे आह्मी वागत नाहीं हे पूर्ण निष्ठा आमची आहे. असे असतां आह्मांस वारंवार ल्याहावें ऐसें काय आहे? आझी तर स्वामींचे आज्ञेखेरीज नसावें आणि आमचे मनोरथ स्वामींनी आपल्या तपोबळें पूर्ण करावे. न कळे तर देव बोल लावील. ( पुढील भाग फाटला आहे.) [ लेखांक ३४२] श्री. पु॥ श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विज्ञापना बारा बैलांचे दस्तक मुंबईचें देणें झणोन आज्ञा. त्यास ये विसींचें उत्तर सोमाजीजवळ सांगितले आहे. विनंति करील त्यावरून -