Jump to content

पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३११ [ लेखांक ३४०] श्री. पुरवणी श्रीमत् महाराज राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विज्ञापना सोमाजींनीं केशर कृष्णागराविशीं स्वामींची आज्ञा सांगितली. त्याजवरून केशर तोळा ८८- १, कस्तुरी ८८८१, कृष्णागर वजन ८४॥ येणेंप्रमाणें सेवेसी पाठविले आहे. पावलियाचें उत्तर पाठवावें. “सर्प बिळांत आहे. फडा करून धुसधुसतो. त्याचा विश्वास न धरणें" ह्मणून आज्ञा. त्यास तो सर्पाचा विश्वास न घरावा उची- तच. त्याहीमध्ये स्वामींची आज्ञा. मग विश्वास कोण धरील ? परंतु सर्प कोणता, बीळ कोणतें, तें आमच्या चित्तांत आलें नाहीं. तरी ल्याहा- वयाची आज्ञा केली पाहिजे. कल्याणच्या पांचा हजारांची मुदत होत आली तरी रुपये पाठवणें ह्मणोन आज्ञा. तर प्रस्तुत येथें ओढ आहे. पुढें ये विसींची विनंति स्वामींजवळ करणें ते करूं. स्वामींची आज्ञा आह्मांस सर्वप्रकारें वंद्य आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. श्री. [ लेखांक ३४१] पु॥ श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति स्वामींनीं लेंकरावर चार गोष्टी रागें भरून शिकवणुकेच्या लिहिल्या. त्यास जसा भाव आमचा स्वामींचे पायास असेल तसें फळ पाऊं, यांत संशय नाहीं. स्वामींचे आज्ञेप्रमाणें तूर्त येणेंप्रमाणें जिन्नस पाठविली असे. घोडी निळी, गरीब, स्वामींचे बसावयाचे कामाची आहे. यास्तव पाठविली असे. कृपा करून अं गीकार करावा. सयाजी कनोजे याजविसीं प - - व्याजाचे रुपायांची वरात हि शोत्राप्रमाणें दादोबावर पाठविली आहे. रुपये देतील. जगजीवनंपतांविसीं स्वामींनीं आशा केली. त्यास त्याविसीं स्वा-