पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ " , हीं कामे संभाजी शिंदे ह्यांजकडे सोपविलेली असत. येणेंप्रमाणे कोंकणांतील व्यवस्था आटोपून व कोंकणांतील आपले प्रिय मित्र कान्होजी आंग्रे त्यांचा निरोप घेऊन स्वामी देशावर येण्यास निघाले. कान्होजी आंग्रे व स्वामी ह्यांचा प्लष्कळ वर्षीचा स्नेहसंबंध असल्यामुळे त्यांची परस्परांवर फार भक्ति जडली होती. स्वामींसारखा महात्मा आंग्रे ह्यांस वारंवार हितमंत्र सांगावयास व संकटप्रसंगीं धीर द्यावयास असल्यामुळे त्यांचा वियोग आंग्रे ह्यांस दुस्सह वाटावा है अगदीं साहजिक आहे. आंग्रे ह्यांजकडे स्वामींचें बरेंच द्रव्य येणें | होते. त्याच्या व्याजाचा हिशेव त्यांस मिळाला नव्हता. तो द्यावा व आंग्यांच्या लोकांनी हत्ती अडविल्यामुळे स्वामींचें झालेले पंचवीस हजारांचं | नुकसान, आंग्रे ह्यांनीं देवास एखादें गांव इनाम देऊन, त्या रूपाने भरून काढावें अशी स्वामींची इच्छा होती. त्याप्रमाणे स्वामींनी आंग्रे ह्यांस पत्र पाठवून !' पूर्व ऋणानुबंधसंबंधेकरून कोंकणांत येणें जाहलें, व तुझांकडेस तुलसीदल आहे तें नकदी तुझांकडेस आहेच. ( त्याचा) व्याजाचा हिशेब येणें व हत्तीमुळे पंचवीस हजार रुपये पडिले ( ह्याकरितां ) गोटणे श्रीस द्यावे. ” असा आशय कळविला. त्यावर कान्होजी आंग्रे ह्यांनीं विनोदानें असें उत्तर गठविले की, “ऋणानुबंधेकरूनच अवघे पदार्थ घडतात. ते गोष्टीचे सामा जयपक्ष असतील त्यांनी सुखदुःख न मानावें। आणि स्वामी तो परमहंस, सुखदुःखातीत स्वामी असतां, क्षणक्षणा, फलाण्यानें फलाणे जाहलें, हत्तीमुळे फलाणे गेलें, याप्रकारें लिहून पाठवितात याचा विचार काय? हा मोह मनुष्यास न व्हावा. यास्तव याविशीं कितेक श्रुतिस्मृति प्रवर्तल्या आहेत. ऋणानुबंधिनः सर्वे पशुपत्रिसुतादयः । ऋणक्षये क्षयं यांति का तत्र प्रतिवेदना ॥ १ ॥ इत्यादिक शास्त्रार्थावरून कोणाचें काय गेलें व कोणी नेलें? या उपरी स्वामींस उचित नाहीं कीं, जाहले गोष्टीची क्षीत मानून लिहून पाठवावें. सर्व गोष्टीस भगवदिच्छा प्रमाण असे. वरकड, इकडेस तुलसीदल आहे त्याच्या व्याजाचा अर्थ लिहिला, तरी ऐसे विचार तोंडींच असत नाहींत आमचें कांहीं लिहिले पुसलें स्वामींजवळ असले तरी आह्मीं व्याज देऊं; अन्यथा एक टक्काहि व्याज देणार नाहीं. आम्हांजवळून प्रतिवर्षी स्वामींस पावते त्याचा आजतागायत @