पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० काय आहे ? नारो गणेश आलिया- वरून स्वामींचे बोलीप्रमाणे नारो गणेश यांजपासून रुपये घेऊन से- वेसी पाठवूं. · गोपाळनाईक इंदापुरकर यांचे कर्ज अंबरो रोडगे याजकडे आहे. खतपत्र आहे. मागत असतां देत नाहीं. गोपाळनाईक गरीब, जात- वान आहे. यांचे कर्ज उगवून देणें ह्मणोन आज्ञा. त्यास स्वामींचे आशेपेक्षां अधिक काय आहे ? अंबरोजी रोडगे यांस ताकीद करणें तैसी करून कर्ज उगवे तें करितों. बहुत काय लिहिणें हे विनंति, [ लेखांक ३३९] शिवराम महाडीक यांस तुळ- जाजी पांडरा शिंपी वस्ती कसबे पुणे याचा भाऊ खंडोजी पांढरा याणें सोइरीक देऊं केली असतां तुकोजीस दगलबाजी करून द्वाही दुसरी केली आहे. तरी शिवरा- माची सोइरीक शिवरामास दे- वर्णे ह्मणोन आज्ञा. त्यास येविसींचें उत्तर आलाहिदा लिहिलें असे. ● श्री. पु ॥ श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- विज्ञापना शिवराम महाडीक यांचे सोईरिकीची तहकिकात केली. त्यास सोईरीक शिवरामाची खरी आहे. त्याची त्यास देणें ह्मणोन आज्ञा, आह्मीं ताकीद केली; परंतु तुकोजी सदरा उगाच लबाडीच्या गोष्टी सांगत होता. ते त्या गैरमाकुल, तुकोजी सदरा सौभाग्यादिसंपन्न मा- तुश्री बाईसाहेब वाडा पहिला यांच्या चौकांत राहतो. त्या हिमायतीनें नवदिगर करील तर त्याचे स्वामींनीं पारिपत्य करावें. आमचा गुत्ता कांहीं तेथें नाहीं. बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे हे विनंति. -