पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ त्याजी केसरकर यांसही ठावकें आहे. ऐसें असतां कोंकणप्रांतें तुझांक- डील जिवाजी प्रभू कमावीसदार महिपतगडर्डी आहे. त्याणें पांवस तर्फेचें डोरलें, महाळुंगे या गांवचे रुपये ८ वसूल केले. ऐशास जिवाजी प्रभू यास आपलें पत्र देणें जे, श्रीचे गांवचे सनदा आहेत. त्यांचे वाटेस न जाणे. रुपये आठ घेतले आहेत तें पत्रदर्शनीं परतून देणें. याजउपरी गांवावरी रोखा केलांत ह्मणजे तुमचा मुलाहिजा होणार नाहीं. ऐसें पत्र लवकर पाठविणे. अल्प गोष्टीकरितां महाराजास इटकावें ऐसें नाहीं. याजकरितां तुझांस लिहिले आहे. श्रीचे गांवचे रुपये घेतल्याने तुमचें अधिक होत नाहीं, आणि न घेतल्यानें तुमचें बरेंच होईल. ऐसें जाणोन लौकर कागद पाठवणें. बहुता लोकांची तुमची भिक्षा पावली. (अपूर्ण) • [ लेखांक ३३० ] श्री. ● मननिर्मळ गंगाजल मथुबाईस आज्ञा ऐसीजेः- तुर्की लिहिलें जे, शामलाचें निर्मूळ होऊन देवाची भेटी घ्यावी हा हेत आहे. स्वर्गीचे देव जे अमृतपान करितात तेही भार्गवाची भेटी व्हावी हे इच्छा करितात. भार्गव ह्मणजे चिरंजीव येरवीं येणें कोठें होतें ? तुझ्याच पुण्ये भार्गवें निर्मूल करून तुझांस भेटीस आणिलें, "बकाजी नाईक यांणीं जिवाभ्यास करून बाणकोट मंडणगड फत्ते केला. " ह्मणून लिहिलें. तरी वकाजी महाडीक कामाचा आहे. त्याजवर दया तुझीं बहुतशी असों देणें गोंवाई आंबे यत्न करून पाठविलेत ते पावोन कोटीशा आनंद जाला बहुत बहुत संतोषी जालों. निष्ठा अंतरापासून आहे हे कळों आलें. तुझीं लिहिलें, दोनी स्थळे राहिलीं आहेत. त्यांचा प्रत्न ( प्रयत्न ) करून श्रीआशीर्वादें लौकरीच हस्तगत होतील. तरी ज्याचें तळ कोंकण त्याचे चित्तांत तुझांस कोंकणचें राज्य द्यावें. हें चित्तांत असले तरी तुमचेच हातें दोनीं स्थळांचें यश श्री तुमचे पदरीं पाडीतच आहेत. लौकर दोनी स्थळें इस्तगत आलियाचें संतोषवृत्त -