पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०३ मानाजीचे वाईट करीन तरी स्वामींच्या पायांची शपत, व सरखेलाची शपत. पहा, पहा, मरतां मरतां सरखेलास पाल किल्ला आला. तो किल्ला राजा मागत होता; परंतु त्यांनीं दिला नाहीं. तूं तरी सरखेलाचा पुत्रच आहेस. सरखेल बोलिले होते जे, 'जयसिंगामागें मानाजी तुझांस उपकारास येईल. यासी उपदेश करणें.' जयसिंग धावडशीस भेटीस आला तेव्हां तीनशे रुपये मजपासून घेतले आणि बापु बागलास मुरु- डची महाजनकी देतों ह्मणून आमच्या पायाची क्रिया केली. आणि मागत्यान बेमान जाहला. ते क्रिया त्यास लागली. आणि कृष्णं- भटाची देशमुखी पूर्वापार आहे. आह्मी रामेश्वरास मागें पळोन गेलों तेव्हां चार मुद्दे कान्होजीस घातले कीं, किरवंत जातींत घालणें. ***

    • रतना भंडारी सोडविला. आणखी कृष्णंभटाची देशमुखी दे. त्यास

कानोजी बोलिला, कृष्णंभटाची देशमुखी खरीच आहे. दुसरे वेळीं तुझी या. देशमुखी कृष्णंभटास देतों. त्यावरी जयसिंगानें उदक घातलें, संभूनें उदक घातलें. लक्ष्मीबाईनें उदक घातलें. तिघांनी उदक घालून देशमुखी करून दिली. ते संभूनें जयसिंगाचा शिक्का लटका केला. आणि कृष्णंभटाची देशमुखी काढिली. हा त्याणे मोठासा अन्याय केला, बरें याचा भोक्ता श्री आहे. माझ्या जिवास बरें वाटत नाहीं. शिवरात्री- कारणें राजे, विरूबाई, दोघी राण्या, फत्तेसिंग व सरकारकून आमचे भेटीस आले. दोन दिवस राहोन सवेंच गेले. आतां फारसें जिवास बरें वाटतें. तरी पांच गुलाबशिसे चोखटसे, आणखी दहा शेर सेंधेलोण कांहीं तुझे संग्रहीं सुरण असिलें, तरी येईल चित्तास तरी बेगी पाठवून देणें. [ लेखांक ३२९] भार्गवराम. मातुश्री लिंबाई व केदारजी व मानसिंग यांसी आज्ञा केली ऐसीजेः- श्रीस इनामगांव छत्रपतीनें दरोबस्त देखील सरदेशमुखी दिली. जो- -