पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०५ लिहोन यंदाचें समाधीस भार्गवक्षेत्रीं तुझीं खासा यावें ऐसें केलें पा- हिजे. दोनी स्थळांचें यश तुमचे पदरांत भार्गवें घातलें तरीच आह्मी यंदां खाले समाधीस येऊं नाहींतरी खाले यंदां येत नाहीं. तुझांस कळावें ह्मणून लिहिलें आहे. [लेखांक ३३१] श्री. - मननिर्मळ गंगाजळ मथुराबाई यांसी आज्ञा ऐसीजे:- पत्र पाठविलें प्रविष्ट जाइलें, मानाजीवर कृपा करणें ह्मणून लिहिले, तर तुझी कृपा मानाजीवर असलियासी तरेल. वरकड, आझीं तेथें यावें; आमची। पूजा उत्तम जाहली तर तुमची कीर्त व आमचा लौकिक. याकरितां दोनी भ्रम आह्मीच राखतों. पुढें ईश्वरें दिलियासी येणें ते समयीं येऊं. तुझांस सुवर्णाचीं तारवें श्रीनें दिलियासी सहस्र वेळ येऊं. लक्ष मागूं. बहुत काय लिहिणे. [लेखांक ३३२] श्री. राजकृपा नाहीं ऐसें जाइलें ! हल्लीं जर निष्ठा वडिलांप्रमाणे तुळा- जीनें धरिली तर भार्गवदया होऊन बरेंच होईल. मुख्य निष्ठा असली पाहिजे. कृष्णंभट देसाई याजवर आमचे दया होती. तुझांसही लोकांहीं सांगितलेंच असेल. याजकरितां याजवर दया तुझीं असों देणें. याचें बरें असेल तें तुझीं केलियास श्री तुमचें बरें करील. श्री. [ लेखांक ३३३]

  • * *तरी आजि तागायत डोरले महाळुंगेचे आह्मांस रुपये तीन

हजार साडेतीन पावले असतील तर आझी तुझांस रोकडे आठ दहा हजार पावेतों रुपये देतों. आणि तुझीं धोपेश्वरचें देऊळ, तूं कर. माझी तूं आई; माझा तूं शिष्य; माझा तूं सखा. १ हे पत्रोत्तर लेखांक २०३ च्या पाठीमागे लिहिले आहे. २० माझे आई, देऊळ जर