पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०२ धरणे. आमचा विश्वास तुझांस काय ? परंतु आझीं आपला वारा तु- मच्या वाऱ्यांत घातला आहे. कांहीं शाक भाजी मागतों ते देतां तुझी कष्टी होतां. शाबास तुझा धीर ! [लेखांक ३२७] श्री. सहस्रायु चिरंजीव भार्गवदूत मानसिंग आंगरे यांसी आज्ञा केली ऐसीजे, बहुतां दिवर्शी स्मरण करून पत्र पाठविले [तें] प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहला. श्रीनें तुझे आत्म्यांत आत्मा घातला झणून तुजला रोज पांचरों शिव्या देतों जे, तूं अंतकाळीं कामास येशील. संभाजी आंगरे यांच्या मनामध्यें जे, आझीं तेथें जाऊन तुझांस श्रापावें. तर तेथें येऊन त्याणें आमची छळणा केली तो श्राप त्यासच लागला. हल्लीं त्याकडील माणसें आलीं व कागद आले, ते आह्मीं माघारे फिरविले. ते कित्येक शरण आले परंतु भेट दिली नाहीं. तर बाबा, तुजला आझीं काय संकट घातलें ? केथे मेथें मागत होतों. आझांस दिल्यानें सुदामाची गत होईल. आझी साधुसंताची पायधूळ आहों. काय मागतों जे, कांहीं तूप, कांहीं गुलाब, कांहीं द्राक्षे, साखर, सुरण मागतों. तें तुमचे चित्तास नये. बरें ! समाधिविसर्जनास वस्त्रे पाठविलीं [तीं] पावलीं. तुझांस प्र साद तिवट लाल १ पाठविले आहे. घेणें. [लेखांक ३२८] श्री. चिरंजीव सहस्रायु विजयीभव भार्गवशिष्य मानाजी वसिष्ठशिष्य- परी तुज आज्ञा ऐसीजे:- मानसील तरी गुरुआज्ञा विशेष आहे. तरी मथुराबाईचा बहुत सन्मान करून पालखी पाठवून आपल्याजवळ घेऊन जाणे. तेणेंकरून लौकिकीं कीर्ति होईल. आणि कान्होजीसारखें यश येईल. यानंतर संभुवावाचा कागद आला आहे कीं, तुझी म जला सरखेलाचे ठायीं आहां. आह्मां दोघांची गोडी करा. आपण जरी -