पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३न नेट ३०१ • रवाना करावीं. येविसीं राजपत्रे व आमचें पत्र गेलेंच आहे. बहुत काय लिहिणें हे आज्ञा. मानसिंगास दोन गोष्टी सांगितल्या [ त्यांत अंतर ] त्यापासून काडीइतकें सहस्र वांट्यानें पडणार नाहीं. आह्नीं चित्त शोधून पाहिलें. तुझीं आतां लेकुरबुद्धि न करणे हे आज्ञा. दोघे भाऊ एक होऊन एखादे आभाळास हात घालणे. [ लेखांक ३२६ ] श्री. मानाजी आंग्रे यांसी आज्ञा ऐसीजे:-पत्रे पाठविलीं प्रविष्ट होऊन आमचे चित्ताचा निशा जाहला. इकडील वर्तमान तर पिलाजी जाधव विजयदुर्गाहून वरते आले. ते जागां कांहीं सौरस्य नाहीं. रघुनाथ प्रभूच्या बायका सोडावयासी आग्रह करीत होते. त्यासी तो मान्य करीना. बायका कोठीस होत्या. त्या दारू वाटावयासी लाविल्या. यासी उत्तर दिल्हें जे, तुमच्या चित्तांत खालीं स्वारी करावयाची उद्यां असेल ते आजच करणें ऐसे परनिष्ट सांगितले. त्यावरून जाधवराव व तो आला. आझांस संभुसिंगानें पूर्वी पत्रे पाठविलीं जे, एक वेळ भेटीस येणें. व हल्लीं भला माणूस व पत्र पाठविलें जे, तुझी भेटीस येणें. यासी प्रत्योत्तर पाठविलें जे, या प्रसंगांत भेटीचें प्रयोजन काय आहे ? तुमच्या पुण्ये थोडें बहुत काम चाललेंच आहे. तुझांस दो चौ कोटींचा लाभ जाहला ह्मणजे आह्मांस संतोष आह्मी कांहीं शाखभाजी, वल्कलें मागों. सारांश गोष्ट जे, तुमचें अभीष्ट ह्मणजे आह्मांस संतोष. तुझी तों धीरवंत, औदार्यपरिपूर्ण, आहां. संभुसिं- गानें धीर घरुन जाधवास परनिष्ट सांगितलें जे, उद्यां याल ते आतांच या; तर तुमचें कर्तृत्व त्याजहून धीराचें आहें. पाणी पाण्याकडेस जातें ह्मणून तुझांस लिहिलें. तुमचे पत्रांत एकवचन ऐकोन संतोषी जाहलों. विशेष काय लिहणें १ पिलाजी जाधव मोठा मायावादी आहे. याचा विश्वास न पुणे नगर वाचन मंदिर, पुणे ८२१९० वर्ग •●●●●●●00000 .....