पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांहीं नाहीं. आणि येथे सातारा त्याचे बापभाऊ आहेत ते म्हणता मच पाथरवट आणा; नाहीं तर आम्हीं महाराजांजवळ सांगोन तुमचे गांवी कौल पाडूं.” यास आमचा अन्याय काय ? पुढे पाथरवट कैसे येतात? याची तज वीज काय करावी ? आमचा तो यत्न नाहीं ! तुझीं इलाज लिहून कुराल की काय ? नाहीं तर कलमाह (?) यास लिहिलें तर कांहीं त्याचे बह होईल की काय तें लिहिले पाहिजे. , येणेंप्रमाणें चित्तांत आणून आह्मीं पुढे काय करावें तें लिहिलं पाहिजे. कांहीं सुचत नाहीं ! आजीवर श्रीजवळ मागत होतों जे, बाजीरायाचे पदरीं यश पडावें आणि आम्हांस त्यांणीं सुखी श्रीस्थळीं राहावें ऐसे करतील. श्रीने यश दिलें. आतां याचा उपराळा होऊन आमचें राहणें होत असेल तर करावें. नाही तरी काय तें लिहिले पाहिजे ". T- में वरील पत्र पाठविल्यानंतर बाजीराव पेशवे ह्यांजकडून स्वामींस कोंकणा सोडून देशावर येण्याबद्दल उत्तर आलें. नंतर स्वामी श्री परशुराम येथी देवस्थानाची नीट व्यवस्था करून व तेथे आपल्या वतीनें गणेश बहार तां नामक एक कारकून ठेवून साताराप्रांती गेले. देवाची सर्व चीजवस्त त्यां आंग्रे ह्यांचे ताव्यांतील रसाळगड किल्ल्याचा सुभेदार संभाजी शिंदे जवळ ठेविली. ह्या सुभेदाराची स्वामींवर फार निष्ठा होती. धावडशी गेल्यानंतर स्वामींचा ह्या सुभेदाराशीं एकसारखा पत्रव्यवहार चालत एवढेच नव्हे तर धावडशीहून देवाकरितां मिळेल तें भिक्षाद्रव्य व इनाम गां- वाचा वसूल स्वामी त्याकडेच पाठवीत असत. गोठणें व परशुराम येथील देवस्थानावर देखरेख ठेवणें, कोंकणांतील स्वामींच्या गांवांचा वसूल घेणे व त्यांची व्यवस्था करणें, आणि आंग्रे व हबशी ह्यांच्या कडील बातमी पोहोचविणे १. पाथरवटासंबंधाने स्वामींचा व हबशाचा पत्रव्यवहार झा पूर्वी झाला होता असे लेखांक २५३ वरून दिसते. ह्या लेखांकाची तारीख छ० २९ माई मोहरम सन ९ जुलूस झणजे ता० ५ सप्टेंबर इ० स० १७२७ आहे. क वरून हा पाथरवटासंबंधाचा त्रास स्वामींस केव्हां झाला हे कळून येते. नंतर एक दोन महिन्यांनी ही यादी स्वामींनीं बाजीराव पेशवे ह्यांस पाठविली असावी.