पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मग तुमचें आझांस कांहीं एक नलगे! तुमचे चार लाख रुपये मसल- तीचे* * * (यापुढे फाटले आहे.) [लेखांक ३२४] श्री भार्गव चिरंजीव अवतार. चवदालक्षांचा घणी तो आहे देवळीं, त्याचा भक्तराजशिरोमणी तुळाजी सरखेल व योगभ्रष्ट कान्होजी त्याची निष्ठा होती. त्यांणीं काय काय सेवा केली! कितीक कामे झालीं ! एक मालती पुष्प दिल्हें, त्या प्रसादें कलंकी धरून आणिली नवा लाखांची. एका सुवर्णदुर्गापासून किती किल्ले घेतले ? त्याचे निष्ठेप्रमाणें तुझी निष्ठा असली तरी अंज- नवेली आली. सत्य करून जाण. मी हरिभक्ताच्या गाई राखितों. आ पण भक्तीस्तव सातारियास आलों. येथें राजेश्रीनीं भक्ति करून आणून क्षौर केलें. बरें वाटत नव्हतें याकरितां आणिलें. पुजेसमय धामणी आणि सोनगांवचें उदक घातलें, अंजनवेली आलियावरी तुझी चालवा. श्रीचा प्रसाद शिरवेष्टन, वज्रकवच व तीळशर्करा पाठविली ती घेणें. तुमच्या बापानें अहिल्या सेवेशी उदक घालून दिल्ही. तुझ्या भावानें राधा, आनंदी, सोनी ऐसे जैसी तुझा भाऊ यांणीं दिल्या. संभाजी आंगरे यांणी पुरता मजसी दावा बांधला. जैसा भस्मासुरानें बांधला तैसा बांधला. तुजदेखतां बांधला. श्रीच्या ठायीं निष्ठा असों देणें. अजंनवेलीवरी लगट करावा. काढावा. हे आज्ञा तुझांस शाहूजीनें सरखेल दिली. तुह्मांवरी दया फार आहे. आज्ञा. . [ लेखांक ३२५] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव तुळाजीस आज्ञा ऐसीजे:- तुझे सहस्र अन्याय जाहले ! तुजला पत्र न लिहितों ! परंतु मानसिंग याची [व] तुमची गोडी व्हावी, महत्कार्य सिद्धीस जावें, याजकरितां पत्र लिहिले आहे. तर कबिले, बायका जे तुझांकडे मानाजीचीं आहेत तीं लावून