पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९९ ● घेतात. आणि हें देवाचें चतुरा (न? ) ठेविल्यास इहलोकीं परलोकीं बरें नसे. अंतोबा व खंडोजी पाठविला आहे. सांगतां कळेल. द्रव्य आ लियावर मी तेथें येईन. तुझांस आशीर्वाद देईन. मी खांसा येव्हांच येत होतों. त्यास शरीरी आरोग्य नाहीं. याकरितां अंतोबा व खंडू पाठ- विला आहे. मागाहून द्रव्य आलियावर येतों. गोठणें यावर वेढ्याचा अगर कोणे गोष्टीचा रोखा न करणें बहुत काय लिहिणे? . श्री. [ लेखांक ३२३] पुरवणी तुळाजीरामास आज्ञा ऐसीजे:- देवाचीं वस्त्रें खरीदी करून पाठविली आहेत. ते पाहणें तुमचा नवा अवतार जाइला ह्मणून आह्मांला तुमची भेट हवी. आह्मांस तुमचा अडकारुका कांहीं देऊं नको. तुझांस अडकारुका खर्च फार जाहला आहे. ऐशास तुमची (भेट) बहुतां दिवशीं जाइली होती. ऐशास हल्लीं भेटी घ्यावी ऐसें चित्तांत आहे. सातारा येऊं नको. आपली वक्रताच असों दे. जेव्हां सौ० बाई येईल तेव्हां येणे. तुझांजवळ मागणें इतकेंच जे, कारखाना खालें घेऊन येतों; तरी कांहीं भात व नागली व वर्या तुमचे चित्तास येईल तरी द्यावें. हबशानें नगारा, दोन जंबुरे व घांट व दरवाजा ऐसा घेऊन गेला. तो खालीं पाठवून द्यावा. देवाचा देवास लावूं. माग धामणी आह्मांस होती. राजा चं- दीस Xxxx दिल्हीच होती. आणि यांहीं राजानें व बाईनें उदक घालोन दिल्हे आहेत. पालखीची वाट पाहतों तरी पालखी आझीं तुमची घेऊन तुमच्याकडे पाठवून देऊं. धामणीचा काजी शंभर माणसांचा जमादार होता. तो हबशीजवळ होता. त्याणें बहुत बायका बाटविल्या. नानाप्रकारच्या स्वाऱ्या केल्या तरी त्यांस तुझी छटणें (छळणें ). तो मोठा चालक आहे. बाबा, गोवळकोटचा हबशी जीवेंच मारावा होता तो कैसा केला (मेला १). वैकुंठवासी कानोजींनीं आह्मांस 'चोर' ह्मणून सिवाड दिल्दी होती तैसी आह्मांस सिबाड देणें. मुंबईहून देवाचें सामान आणावयासी द्यावें. .