पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९८ व जाइली? ऐसें असोन देवाचा रुका जो अभिलाष करील त्याचा निवेश. एकवीस जन्में खणेल. बरें होणार नाहीं. उभे दुपारा अग्नि लागेल. आह्नीं राजश्रीचे कानीं घातले. त्यासी राजे बोलिले जे वडिलांचें कर्ज कां न खंडावें ? ह्मणून उभयतां बायकांकडून कागद लिहिले आहेत. कानोजी व सेखोजी व संभाजी यांना स्वर्गवास करणें असेल व नरकां- तून काढणें असेल तर तूं उतराई पितृऋण कर. नाहींतर तुजवरही गो- मूत्र टाकीन. मग आह्मांस बोल नाहीं. जर वडिलांचे उतराई जाहलास तर श्री ऊर्जित करील, व पितरांस स्वर्गवास होईल. जर ठेविलेंस तर कुरुक्षेत्रीचे वृद्धीनें जन्मजन्मीं वाढतें व्यतिपात, ग्रहणें, महापर्वे जातात. येणेंकडून उत्तम नसे, असें समजोन जो माझें द्रव्य ठेवील त्याच्या पितरांस अधोगत व त्याचें ऊर्जित होणार नाहीं. तूं तो शहाणा आहेस. इतकें लिहिले आहे हें चित्तांत आणून वर्तणूक करणे. श्रीचें द्रव्य द्यावें. आशीर्वाद घ्यावा. येणेंकडून उत्तरोत्तर कल्याण श्रेयस्कर आहे. कांहीं तुजजवळ मागत नाहीं. माझें द्रव्य मज देऊन उतराई होणें, स्वर्गवास तुझे पिते, बंधु करतील. पैकियांत पंचवीस खंडी लोखंड कांबीचें देणें, दहा खंडी साखर देणें, मणभर नारायण तेल देणें, व चंदन पांचमण देणे; व द्राक्षे एकमण देणे. लवंग एकमण देणे. रेशीम एकमण, केशर ८॥ कस्तुरी 61, जायफळ जायपत्री ८१ देणे. गोठणे गांव दिल्हें तेव्हां कान्होजीनें उदक घातलें तर तेथील वेंठ बेगार नेऊं नका व खाजणें तुझांकडे नेतात तें खाजणें देणें, व भात नेलें तेंही देणें. डोरलें महाळुंगे येथील रुपये नेले ते पाठविणें. विसाजीपंतास ठा- ऊक आहे. येणेंप्रमाणे देणें. जिन्नस द्याल त्यांची रास्त किंमत करून रुपये माझ्या रुपयांत वजा करून बाकी रुपये रोख पाठवणे. यासी चुकलास तर तुजवर गोमूत्र टाकीन. मग मजला बोल नाहीं. राजाच्या बायकांहीं उपदेश घेतला. लोक आपले पदरचे देतात आणि माझा आशीर्वाद ●