पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९७ पाप मी घेतों. आणि बाबा सरकारांत जें ठेवसील तें मज वेघळ तुज जोड काय ? ज्या हरिश्चंद्रानें स्वप्न दान दिलें होतें त्यास कृष्णंभटाचें उदक त्वां घातलें तें तूं खरेंच केलें, तैसें हें महाजनकीचें तुझें वचन सत्यच आहे. . [लेखांक ३२२] श्रीभार्गवराम. सहस्रायु चिरंजीव विजयीभव तुळाजीस आज्ञा ऐसीजे:- तुजला अहिल्येचें वोटीस घातलें होतें. याजकरितां तिजला पांच हजार रुपये दिल्हे व तूं माझा शिष्य व तिचा लेक ह्मणून दोन हजार तुजला दिल्हे. त्यास मागें कानोजी बोलिला जे, तुमच्यासाठीं हजार रुपयांतून रुपया ठेवील त्याची आई वंध्या व त्याचा निर्वेश होईल. त्यास संभूनें मजशीं दावा लाविला. हातचे निशाण व बंदूक व पासोडी अंगावरील हिरोन घेतली. तेथूनही कागद लिहिला जे, क्षणक्षणा कागद लिहूं नका. त्यानें मजला उभे दुपारीं लाथ हातली. आह्नीं त्यास श्रापिले. तुजला आशीर्वाद दिल्दा जे तो मरेल. तूं तक्तीं बैसशील. तेव्हां तुझी भेट घेईन. तुझे पाईची बेडी काढावी ह्मणून चिमाजीजवळून क्रिया घेतली जे, तुळारामाची बेडी काढणें. त्याची गत काय जाहली? कानोजीनें इत्ती नेला त्याची गत काय जाइली ? हबशी याचें राज्य टाकिलें त्याची गत काय जाहली? आपले आपले जागा मरतात. विरूबाई यांणीं लाविले [?] त्यांची गत काय ● - .. १. हे पत्र स्वामींच्या सर्व पत्रांहून अगदीं वेगळें आहे. याची लिपी बालबोध असून याचे शेवटीं अर्धा उमटलेला असा एक शिक्का आहे. त्या शिक्यांतील ‘लस्य मुद्रा जयति सर्वदा' एवढीं अक्षरें स्पष्ट दिसत आहेत. आझीं स्वामींचीं जेवढीं पत्रे पाहिली तेवढ्यांवर आह्मांस एकही शिका आढळून आला नाहीं. फक्त ह्या पत्रावरच हा अपूर्ण शिक्का उमटलेला दिसतो. हे पत्र स्वामींचें आहे ह्यांत शंका नाहीं. तेव्हां हा जर त्यांचाच शिक्का असेल तर त्यांतील संपूर्ण अ क्षरें समजणे अत्यावश्य आहे.