पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९६ जाला हाणून तुझीं राजपुरीस कागद लिहून *** तुझा बाप वेडा नव्हता. त्याणें आमचे दरगास पेढें, आंबडस, नायसी तिनी गांव दरोबस्त देऊन चालवीत होते. तेणेंप्रमाणें तिनी गांव करार करून सनदा दरोबस्त तुझीं अभिमान धरून आणविणें जॉवर देवाचें बरें नाहीं तोंवर कोंकणचे कोणाचें बरें होत नाहीं हें पुर्ते समजणें. तुझांवां- चून परवाने येत नाहींत. देवावर पाणी पडणार नाहीं ! . [ लेखांक ३२० ] श्री. सहस्रायु चिरंजीव संभुसिंग यांस आज्ञा केली ऐसीजे:-तुझीं पा याची क्रिया केली. मुद्रेनिश कागद दिल्हा. येधवां एक बोलाल, घडी- भरानें एक बोलाल बादते (?) गोठणेयासी पाठविले ह्मणून बोलिलेंत. फार तरी वीस रुपये किंमत होती. परंतु पाठविलेंत नाहीं ! तुमचे श ब्दाचा विश्वास काय १ तारूं सांपडलें तें आमचे आशीर्वादें सांपडलें, तुझीं आह्मांपार्शी नेम केला जे, आधीं गोवळकोट घ्यावा; मग अंजन- वेली घ्यावी; तेथून कुलाबा घ्यावा. गोवळकोट, अंजनवेली न घेतां एकाएकींच कुलाब्यास जावें. येणेंकरून राजा व विरूबाई व सर्वजन आह्मांस बरें काय झणेल ? दिल्ही आगरे पावेतों कीर्ति जाहली आहे ते अपकीर्ति होईल. अंजनवेली घेतली ह्मणजे कुलाबा घटकेमध्यें आला. कुलाचेयासी जावें नलगे. ऐसा तुमचा त्रास मानाजीस पडेल. . [ लेखांक ३२१ ] श्री. चिरंजीव विजयीभव बाबा सवाई जयसिंग सरखेल यांस आशाः— मुरुडचें महाजनकीचें तुम्हीं सविस्तर वर्तमान लिहिलें जे, शंकरभटास देत नाहीं. अमानत दिवाणांत ठेवितों बहुत उत्तम. याप्रमाणे करणे. परंतु शंकरभटाकडील तिनी कागद आणवून पाठविलेत नाहींत. आधीं पाठवणें. तुझा देव मी तुझा बाप मी. परंतु इतक्यांच्या (चे १) -