पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९५ गोठणीचीं खाजणें तुहीं घेतलीं तर तेणेंकरून श्रीचें न्यून होईल कीं, तुमचें पूर्ण होईल ऐसें चित्तांत समजणें महापुरुषा, वर्षामध्ये दहारु- पयांची वानीवस्त आह्मांस पावेना, तेव्हां धन्य माझे कपाळ ! धावडशीस वर्षामध्ये इमारती वेगळ्या करून दहा हजार रुपये खर्च लागतो. शाबास ! शाबास !! संभुसिंगा, बापाचे उतराई झालास ! माझें काय आहे ? मी समस्तांचा जागली आहे. मागें एक भगवी सकलाद व कृ- ष्णागर आदशेर लिहिलें होतें तें तुमचे वस्तु देववलें नाहीं. बरें, तुमचे तुह्मांस आर्जवी असो ! [लेखांक ३१८] श्री. संभूस आज्ञा केली ऐसीजे:– आह्मी तुज भेटीस आलों. तेव्हां राजश्रीचे अनुमतें आलों. आह्मीं तुझांस दोन गोष्टी सांगितल्या, त्या तुझींही मान्य केल्या. आधीं गोवळकोट घ्यावा; अंजनवेली घ्यावी; मग कुलाबेयासी जावें. त्यास आह्नीं तुझी भेट घेऊन आलेयावरी तेंच क्षणीं खंड्स राजाकडेस पाठविला. त्या बराबरी सांगोन पाठविलें जे, संभाजी आंगरे यांणीं आह्मांपासीं नेम केला जे, लोक व भांडीं गोवळकोटास पाठवून गोवळकोट घेतों. तसें राजास सांगोन पाठविलें. राजे बोलिले जे, ‘येतील तेव्हां बावा खरे होतील.' हल्लीं तुझीं सुवर्णदुर्गास आलेंत. आह्मांस तुझीं बोलाविलें, तरी तुमचे बोलाविल्यावरून आह्नीं आलों तरी चौराज्यांत आमची अपकीर्ति होईल. हें तुझांस कैसें समजत नाहीं ? तुझी अंजनवेलीस मुर्चे लावा ह्मणजे आह्मी डोईचे वाटेनें चालत येऊं. ● - [ लेखांक ३१९] श्री. चिरंजीव संभुसिंग सरखेल यांसी आज्ञा केली ऐसीजे:- माणसाचा अभिमान धरावा. तो या लोकीं परलोकीं कामास येतो. भार्गव देव कोंकणचा राजा. देव सर्वोचा पुरातन आहे. तुमचा त्याचा सल्ला