पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९४ काम लाविले आहे; तरी द्रव्य पाठवून देणें नाहींतरी स्पष्ट लिहिणें जे, आपण द्रव्य बुडविलें. मग आझी देशांतरास जाऊं. तुझी लोकांजवळ बोलता जे, बाबा रागें द्रव्य मागतील तर आझांस त्यांणीं उदकच घातलें आहे. कांहीं द्यावें (ऐसें) नाहीं. आणि संतोष मागितलें तर अवघें आहे हे त्यांचेंच आहे. ऐशास महादेवें भस्मासुर यास वर दिला, त्यास भस्मासुर बोलिला जे, तुझ्याच मस्तकीं हात ठे- वितों तैसें तुझी करावयास लागलेत. श्रीचें द्रव्य द्यावें हें तुझांस ग्राह्य आहे कीं काय ? आह्मीं सात पांच कामें घरिलीं, आमचें झातारपण झालें, आमचें वस्तु प्रवास होत नाहीं. देवाचें द्रव्य तुझीं ठेवल्यास उत्तम नाहीं. माझा देह परशरामींच सुटता तर तुमची घन होती. आतां मेरूचें काम धरिलें आहे ह्मणून मागतों द्रव्य घेऊन पुरून ठेवून कांहीं नरकास मज जाणें नाहीं ! [ लेखांक ३१७ ] श्री. सहस्रायु चिरंजीव पूर्वी अभिधान कुबेर संभुसिंग बाबा सरखेल यांसी आज्ञा केली ऐसीजे:- तुझीं पत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन वर्तमान कळलें. तुझीं लिहिलें जे, श्री रामेश्वराचे व कान्होबाचे पुण्येकडून नस- रगड गदींस मेळवितो. तर ही गोष्ट खरीच. तूं तैसाच बापापरीस कर्ता, पुरुषार्थी किती केलीत अंतीमती क्षेत्राचा धनी, व कोंकणचा धनी श्रीभार्गव आहे. हबशी याची गत कशी झाली? रायगडासारखा गड त्याची गत काय जाहली? आतां कोणी चित्तावरी धरीत नाहीं. जर चित्तावरी घरील तर जंजिरा अंजनवेली एका घटकेंत येईल. तूं ह्मण- तोस जे रामेश्वर, तर गतवर्षी इंग्रजांस व त्यांच्या बायकांस सोडिलें तेव्हां रामेश्वर कोठें होता ? तुमचे वडिलास साठ हजार रुपये व तीन हजार होन व वस्त्रे वानी दिलीं त्याचें व्याज काय जाहलें ? गोठणें गांव श्रीस उदक घालून दिला, त्याचे पोटीं तुझीं अवतार घेतला. तीं