पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९३ [ लेखांक ३१५] श्री. जयसिंगास आज्ञा केली ऐसीजे:-आझीं तुजजवळ तीन गोष्टी मागि तल्या होत्या. त्यास तूं आज्ञा भंगिली. शंकरभट उपाध्या मुरुडकर व कानडा व नीळ ठाकूर तिघेजण मन माने तैसी आमची निंदा करि- तात. पृथ्वीवेगळे बोलतात. शिव्यागाळी देतात. तो तुवां आमचा अभिमान धरावा, तो धरिला नाहीं. तेव्हां आह्मांस ईश्वरें कशास ज- न्मास घातलें ? न घालता तरी बरें होतें ! तुझ्या बापानें वाक्षेप केला ह्मणून कोंकणांतून वरघाटें आलों. येथून ही शुकासारखें वैराग्य माझें असेल तरी कळेल. तुजला आह्नीं जें सांगितले तें सत्यच सांगितलें असेल. आणि तूं ह्मटलेंस माझा शिक्का लटका कसा करूं? द्रोपद राजा याणें द्रोणाचार्याचा अपमान केला होता, तसा तूं माझा अपमान केला आहेस. हैं तुज परिणाम कळेल. आपले गड किल्ले जतन कर. ● [ लेखांक ३१६] श्री. - जयसिंगास आज्ञा ऐसीजे:- त्वां माझी आज्ञा मोडिली. याचें फळ इहलोकीं परलोकीं काय होईल तें कळलेच आहे. आझीं तुला दोन तीन गोष्ट आज्ञापिल्या होत्या. त्या लटक्या नव्हत्या. खन्याच होत्या. तूं ह्मणालास जे, शिक्का लटका कसा करावा ? इतक्यावरी तूं माझा काय आणि मी तुझा काय ? कोण्हाचें पोट भरेना झणून लटकें बोलतो? कोण्हास करें बाळें पोसावीं लागतात ह्मणून लटकें बोलोन द्रव्य मेळवितो ? कोण्हाचें राज्य बुडतें ह्मणून लटकें बोलतो ?......चौऱ्या- यशी योनी भोगाव्या आणि एकदा मनुष्य देहासी यावें. याचा दृष्टांत हल्लीं चक्रवतीने काय केलें ? हरिश्चंद्र राजानें काय केलें ? श्रीनें मजला आशापिलें आणि गोमूत्र पान केलें. लटकें बोलोन द्रव्य मेळविलें नाहीं. ऋणहत्या फिटेना. हे द्रव्य दिल्यानें बरें आहे. शिखराचें ●