पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ कोणती फत्ते जाइली ? आझ तुझांपासून घेऊन देवास अर्पून तुमचें कल्याण इच्छावें. आमचा हेत इतकाच होता जे, दा मण साखर व तीन हजार रुपये घेऊन, संतोष पावोन, तुझांस मनांतून आशीर्वाद देऊन येतो. बरें. आझांस कांहीं ईश्वरें न्यून केलें नाहीं. तुमचें थोरपण तुझीं केलें ! [ लेखांक ३१४] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव पूर्वील नाम कुबेर संभुसिंग बाबा राजे सरखेल यांसी आज्ञा केली ऐसीजे. पूर्वी तुमचा आमचा नेम होता जे, पलीकडील वर्षी तुझ सुवर्णदुर्गास यावें, आह्मांस सांगून पाठवावें, आह्मीं तेथें यावें. तेथून पुढें कुलाब्यास जाऊन मानाजीस बोध करून कुलाबा त्याजकडून तुह्मांस देवावा. तो आमचें वचन मान्य न करी तरी त्यास श्रापून यावें ऐसा नेम होता. त्यास तुझी न आलेत. तो प्रसंग ते वेळेस राहिला. हल्लीं त्याचे कागदपत्र येतात. आह्मांस या णतो. परंतु आझी त्याकडे येत जात नाहीं. गतवर्षी जाऊन कुलाबा द्या तुझांस ह्मणावा, ना ऐके तरी श्रापावा, हे गोष्ट राजाच्या (व) बाजी- राऊ यांच्या कानावर घातली. ते बोलिले, “आजिचा प्रसंग एव्हां नाहीं. गेलीयास तो कांहीं तुमचें ऐकणार नाहीं. तुझीं केलें न होय, तरी आ पले प्राणास घात कराल. याजकरितां तुझांस जावयास उचित नाहीं." याज करितां राहिलों. आतां तूं होऊन कुलाब्यास जावयास येणें. मी पुढें, तूं मजमागें, जमाव तारवें घेऊन येणे. कुलाबा घेऊं. त्याचा हिसाब काय आहे ? काम श्रीचे आशीर्वादें होईल. मुखजबानी गो- विंद राम सांगतील ती एकांत ऐकणें. कोणास त्र कळों न देणें. तूं जाणस, हे जाणा. त्याचा मान्याचा देहांत समय आला, तर गोविंद राम ईश्वरें पाठविला आहे, ऐसें समजोन कार्य करणें व निश्चय घरों