पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० ● राजपुरीस आमचे चुकल्या लिहून आह्मांस नशेदपत्रे आणितां याजकरितां हुजूर पत्र लिहिलेत ह्मणजे आपणास बोल नाहीं!" ऐसें दबविलें. व 'चारशें रुपये बापू जोशी गुन्हेगारी देईल. नाहीं तर तुझीं देणें नाहीं तर भेटीस अंजणवेलीस येणें'. ऐसे म्हणतो. ऐशास त्याचे भेटीस आह्मांस जाणे नाहीं. अनादर करील. गांव तो धास्तीनें वोस पडत चालला ! ब्राम्हण दहावीस आ हेत. ते जाऊं म्हणतात. मुलनास गांवची खोती दिली. आह्मांदेखत वेटवेगार गांवची नेतो. हें आह्मीं कैसें सोसावें? याजकरितां आम्ही श्रीस्थळीं राहावें ऐसें नाहीं ! टाकावें तर एक प्रकार दिसतें. यास काय करावें? राहावें कीं नि घोन वरतें यावें तें लिहिलं पाहिजे. तुम्हीं सांगाल त्याप्रमाणे वर्तणूक करूं. , भाद्रपद मास राजपुरीहून याकूदखान यांणी आह्मांस पत्र घरोवाने लिहिले जे, “ आपले घुमटाचे काम होणें आहे. तरी आपणास चाळीस पन्नास पाथरवट चाकर आणून पाठवणे.” त्यास आम्ही लिहिलें जें, “गतवर्षी बाजीराया- कडून पाथरवट आणिले होतेत. त्यांस रजा न द्या, (तेव्हां ) पळोन गेले. ह्मणून धरून आणून अडकविलेत. याजकरितां खाले कोणी न येत. त्यास त्याचा परिहार लिहोन, जातील तेव्हां सुखरूप जावे म्हणून अभय... पाठविले. तें वरून आम्ही सातारा पाथरवटाचे यत्नास माणसें पाठविलीं. त्रिंबकजी साळ- कर यास सांगोन पाठविले. त्यांपैकी एक मल्हारजी पाथरवट राजपुरीस जाऊन बोलीचाली करून, त्याचा कौल घेऊन, दोनशे रुपये अंजणवेलीस रुपयांची चिठी आम्हांकडे पांचशे रुपये देणें ऐसा कागद घेऊन आला. दोनशे अंजणवेलीचे रुपये व तीनशे आम्हांकडील येणेप्रमाणे पांचशे रुपये घेऊन जाऊन पंचवीस पाथरवट घेऊन देवळीं आला. आह्मीं त्यांस सांगितलें जे, "तुमचे चित्तास येईल तरी जाणें न ये चित्तास तर रुपये परतून देणें." त्यास रुपये वांटून घेतले. जायास मान्य झाले. त्यांचे आम्ही सर्फराजी करून बरोबर मा- •णसें देऊन रवाना राजपुरीस केले. तेथे त्यांणी मन माने त्या तैनाता मागि- तल्या. ते मान्य न करीत माघारे जा म्हणत शेवट पंधरा दिवस राहोन खा नांहीं महिना केला. तो कबूल करून कामावर लागले. दुसरे वांटणी रुपये चारपांचशे घेतले. ऐसें बाघवत केले. चाकरी तो झाली नाहीं. आणि आम्हांस ह्मण- तात घेऊन जा. तर त्याचे रुपये पावले ते मागणार. ते कोणीं द्यावे? पाथरवटांजवळ