पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० प्रधान यांचे निष्ठा कोणते प्रकारची आहे ? त्यांचे निष्ठेनरूप ते चित्तावर धरितात तें श्री फत्ते करितो. बाजीराऊ उभयतां बंधु, सर्व संपदा आहे ते स्वामींचे आहे. यास अन्य असेल तर आपण नानाचे वीर्याचे नव्हों ऐसें ह्मणतात. आह्मांकरितां प्राण दे झटलें तरी देईल. ऐसी निष्ठा त्याची. आणि तुझी तो आमचें काळीज; आमचे पुरातन वडि- लांपासून; आणि आमचें ऐकत नाहीं; हे गोष्ट बरी नाहीं ! [ लेखांक ३११ ] श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव संभुसिंगबावा सरखेल यांसी आज्ञा केली ऐसीजे:– बावा येथें सर्वस्व वेंचावें आणि राजा सर्व अवघे वश्य करून घ्यावें, आणि आपले सर्व मनसबा करून घ्यावा, आणि चिरंजीव तुळाजी आंगरे सोडून न्यावें. तुझांस श्री येथून जातांच महालाची तारवेंच सां- पडतील याप्रमाणे होईल. कांहीं चिंता नसे. हे गोष्ट न होय तेव्हां आ- मर्चे देवपणच नव्हे. नांवच घेऊं नका. आह्नीं देवास नवस तीस पुत ळ्यांचा देवास केला आहे. चित्तास येईल तर पाठवून द्याव्या. नाहींतर नका पाठवूं ! तुमचा मनसबा व्हावा, तुळाजी (ची) सुटका व्हावी, याजकरितां नवस केला आहे. आझीं ये वेळेस तुझांस कांहीं वरते या झटलें नाहीं. तुझीं कां आलेत ? आतां सर्वोचे तूंवर झाडणी करा असे ह्मणतील, तितकें मान्य करून देणेंच लागेल. मागतील तें द्याल, न दिल्यास कांहीं येथे होणें नाहीं. विशेष काय लिहिणें ? हे आज्ञा. तुझी आपलें लेकूरपण येथें टाका. कोणास शिवीगाळी देऊं नका. मागें इंग्रज तुमच्या गडाकडे आला होता, तो पराभवातें पावावा, निघोन जावा, तुमचें बरें व्हावें, ह्मणून भुलेश्वरास हजार ब्राह्मणांची समाराधना मानिली होती ते आह्नीं केली. तुझांस कळावें ह्मणून लिहिले आहे. ●