पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८९ परंतु त्वां केलीं. तुझ्या पुण्यास पारावार नाहीं. तरी याजकरितां खेड्या- मधील कोठें एक रुपया, कोठें पांच रुपये, माणूस घर पाहोन भिक्षा करून, कोठें पंचवीस रुपये याप्रमाणे शंभर रुपयांची भिक्षा करून दिल्याने आह्मांस (१) चिंचपुरीं खंडेराव आहे, तेथें लक्ष रुपयांचें (काम) आहे तें दुरुस्त करूं. तुमचे पदरीं पुण्य पडेल. याखेरीज बिडामधीं गांव भिक्षा करून द्याल तरी उत्तम आहे. तुह्मांस वज्रकवच अंगचें आगाऊ पाठविले आहे. घेणें. याचें काय तें उत्तर पाठविले पाहिजे. १० आंगरे. श्री. [ लेखांक ३१०] - ● सहस्रायु चिरंजीव विजयीभव संभु जयसिंग सरखेल यांसी आज्ञा केली ऐसीजे:- तुझ राजपुरीच्या मुक्कामींहून पत्र पाठविलें तें पावून वर्तमान विदित जालें, प्रधान व फत्तेसिंग यांच्या भेटी जाल्याचें वृत्त लिहिलें तें कळों आलें. मज रडत्याचे आसवें पुसिलीं नाहींत; असल्या गोष्टी करितां मी दिलगीर होतों. ते गोष्ट करून अर्जुनासारिखें पृथ्वीचें यश घ्यावें होतें. पुढ्यांत बैसोन मज बाटविलें. माझा आत्मा आपल्या आत्म्यांत घातला. मीं कांहीं तुमचें बरें केलें नाहीं, आणि तुझी माझें बरें कोठून कराल ? आमचेंच प्राक्तन उणें ! त्यास तुझांस बोल काय लावावा ? मीं जे आळ घ्यावी ते मीं सिद्धीस पाववावी. तरीच आमचा पांचवा आश्रम ! माझीही आळ माझे भक्तांहीं चालवावी हें उचित आहे. वरकड तुझी त्या स्थळीं गेलेंत आहां, (तरी) शामल लोकांचा विश्वास न धरावा. आपणास बहुत जतन करणें. तुमचे हातून महत् कामें होऊन यश मोठें पदरीं पडणें आहे. याजकरितां बहुत बहुत जतन आप- णास करणें. जाणीजे छत्रपतीस पुत्राचा आशीर्वाद श्रीनें दिल्हा आहे. तो घडावयाचा ते समयीं घडोन येईल. छत्रपतीची निष्ठा कोणें प्रका- रची आमचे ठायीं आहे हें परस्परें विदितच आहे. तैसीच बाजीराऊ • १९