पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ ८ निवाळकर. श्री. [लेखांक ३०८] सहस्रायु चिरंजीव जडभरत बोधला जानोजी यांसी आज्ञा केली ऐसीजे: – मागें दोन ौसी मागीतल्या होत्या, त्या देतों ह्मणतां. त्या देणार कधीं आणि आझीं तक्र कधीं भक्षावें ? गतवर्षी गाई दोन पाठ- विल्या होत्या, त्यांचें तक पोटभर आजिवर घेतलें. आतां त्या गाई भाकडी जाहल्या. सांगाल तर पाठवून देऊं. हल्लीं तक प्यावयास उत्तम गाई व्याल्या नसल्या तरी गाभण्या, तरण्या, दुधाळू, लौकर वियत ऐशा, दोन गाई पाठवून देणें. आर्ली तक्र घेऊं. तुमचें बरें होईल. तरी अनमान न करितां गाई दोन पाठविल्या पाहिजेत. देणें. नसेल तरी सटल पटल करणें. पुढें देऊं घेऊं ऐसें कशास ह्मणतां ? परिच्छिन्न नाहींच झणणे. पाण्याचें ह्मणाल तर आझी साधु संताची पायधूळ आहों. भार्गव चिंता घरील तर पानाडीयाचाही यत्न करून पाणीही भार्गव लावील. त्याचें काय आहे ! आलीं तुझांजवळ तरी थैल्या भरून रुपये कोठें मागितले आहेत ? तुझीं तरी काय दिले आहे ? पहिला पांच हजार रुपये खर्च लागतो. दहा भक्त आहेत ह्मणून चालतो. दोन गाई तुहांजवळ मागितल्या त्यास मागें पुढें कशास पाहतां ? देणें असेल तर द्या, नाहींतर आमचा कागद परतून देणें. तुझांस प्रसाद नारळ १ व द्रा दोनशेर पाठविलीं आहेत. घेणें. हे आशा. ९ सुलतानजी निंबाळकरें. श्रीभार्गव [ लेखांक ३०९ ] मननिर्मळ गंगाजळ आचार्ये पुण्यशील सुलतानजी बोधला निंबा- ळकर यांस आज्ञा या कलयुगामधीं असीं कोणीं देवळें केलीं नाहींत. १ निजामाकडे गेलेल्या रावरंभा निंबाळकर ह्यांच्या घराण्यापैकी हा सरदार . आहे.