पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७ ● तुंझा बाप लष्करांत होता, तेव्हां पुत्राचा आशीर्वाद दिल्हा. तो तूं मलोजीचे पोटास तूं प्रसादपुत्र आलास. तुजला नशेद (निषेध) करून लिहिलें जें, मायेचे पायावर डोई ठेवून तिचे आज्ञेत राहणे. त्यास तूं आह्मांस लिहिलें जे, मायेचें श्राप पुत्रास लागत नाहीं. तरी तिजला तूं शिवी दिलीस तरी तिचे श्राप तुझें भस्म होईल. तिजजवळ तूं बेअदबी कितेक लहान माणसाच्या बोलें तुफान घेऊन तिजला कष्टी केलें आहे. तुला पुढें वांचोन नांवरूप करणें असेल तरी तिचे पायांवर डोई ठेवून जाले अन्याय बक्षीस करून घेणें न धेस तरी तुझें बरें होत नाहीं. दारू खाऊन बेअदबी, माता ती, तिजजवळ करितोस, हें बरें नव्हे. पाजी तूं आहेस! काय आमचें वचन मोडशील १ तेव्हां बाजीचे बटकीकडून धरून आणून तुजला चाकर केला जाईल. हें पुतैं मनांत आणून आ- नंदीचे समजाविसी करून तिचा कागद आला तरच तूं वांचलास. नाहींतरी तुझा मुलाहिजा होत नाहीं हें पुर्ते समजणें तूं ह्मणशील तीन वर्षी तुझांस हजार रुपये देतों, तर त्याचा आझांस लोभ नाहीं. वाटेचे वाटसराचे बटकीपासून रुपये हजार घेईन. तुझा हिसाब काय आहे ? धनवटीस तिनें आपली वानीवस्त ठेविली होती ते तूं नेलीस. धिग् तुझ्या जिण्यावर ! तुज काय बापाचे धर्मे होती ? तूं हे गोष्ट बरी न केलीस. सर्व जन तुजच हांसेल. तिचे वाणीवस्त देणें. तिचें समाधान करशील तरच आह्मांस उत्तर लिहिणें नाहींतर आह्मांस उत्तरही न लिहिणें. * ●

  • ह्या पत्राच्या शेवटीं खालील मजकूर आहे. त्यावरून वरील पत्र मसुदा

असून पुढील मंडळीच्या संमतीनें तें पाठवावें अशी स्वामींची आज्ञा होती असें दिसतें. "कृष्णाजी व पाटील मौजे माळशिरस यांसी आज्ञा:- अंवदा सालीं माळ- शिरसास वाकोजीकडेस रुपयाच्या मोझ्यास (?) जाणार आहे तो तेथें गेला तर गांवकर मिळोन त्यास दस्त करून पाठवणें वाकोजी देऊरास जाईल सवरील. त्यास नजरेंत अस देणे. कृष्णाजीस कागद आनंदी पवारीण हिजला लिहिला आहे तो तीस देणे. जगजीवनाचा कागद वाचून तीस दाखवणे, तिचे चित्तास येईल तरी लाखोटा करून त्याकडे घेऊन जाणे." - •