पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ लिहिलें, बहुत संतोष जाहला. लिंगोजीनें आझांस नेम केला जे, चवथे दिवशीं सनदा पाठवितों, सरलष्कर सोमवंशी ह्यांच्या सनदा आल्या. हे आज्ञा. [ लेखांक ३०६] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव रणधीर रणशूर अर्जुनतुल्य उदाजी पवार यांस आज्ञा ऐसीजे:- तुझीं पत्र पाठविलें तें पावोन संतोष जाहला. शाक पावल्या. देवाची आणि सुदाम्याची भेटी झाली. श्रीनें सुदाम्याचें दरिद्र विछिन्न केलें. तैसें तुमचें पत्र पाहोन श्रीस संतोष बहुत जाला. निष्ठा देखोन तुझांवर श्रीची कृपा विशेषात्कारें जाली. या उपर तुमचे क्लेश सर्व दूर होऊन लक्ष्मी आणि विजय श्री उदंड देईल. तुमचे निष्ठेचें पत्र देखोन श्रीची तुझांस भेटच जाली. या उपरी आ- दले जन्मींचे क्लेश व याही जन्मींचे कष्ट दूर होऊन संतोष आणि जय पावाल अंतरसाक्षीची भेट तो श्रीची जाली. या उपरी बाह्यात्कारची भेट तुमची आमची श्री करील, तेव्हां सर्व मनोरथ श्री पूर्ण करील. सुदामनगरी सुवर्णाची जाली. तुझीं लिहिलें जें, यजमान श्रमाचा जाण होऊन कृपा करीत नाहीं. अशास तुमची समशेर गाजली, तिचा नामोश त्रैलोक्यांत जाला. यापरीस थोर तें काय ? श्री सूर्यानें कवच कुंडलें कर्णास दिलीं, तैसेंच श्रीनें अंगचें कवच तुझांस पाठविलें आहे. दुर्योधनाचे हातीं राहू होता तो अपार द्रव्य वाटी, परंतु सरेना. त्याची कीर्त नाहीं; आणि पांडवांची कीर्त अद्यापि त्रैलोक्यांत वाखाणितात. पहा, येथें उदंड भक्त आहेत परंतु तुमची (कीर्त विशेष आहे). * [ लेखांक ३०७ ] श्री. सहस्रायु चिरंजीव जगजीवन पवार यासी आज्ञा केली ऐसीजेः- - -

  • ह्या पत्राचा पुढील भाग गहाळ जाहला आहे हे पाहून वाईट वाटतें. हे पत्र

किती मनोरंजक व महत्वाचे आहे हे रसिक वाचकांस सांगणे नकोच.