पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८५ परंतु आमची भेट घेतली नाहीं. आझी मूठभर सूत (१) देतों आणि नाचणीचे आंबील पाजितो. शाहूपासून रंभाजी गेला त्याला अन्नवस्त्र मिळतें कीं नाहीं ? तैसाच चंद्रसेन गेला. तैसाच सुलतानजी निंबाळकर गेला. त्यास बिडासारिखे शक्त (तक्त ?) दिल्हें. ऐसे कितेक गेले ! दादलेचे वेळेस तूंच कारभार करीस. आतां तुझी बुद्धि कोठें गेली ? गायकवाड त्यांचा वाढविला. तो दुसरे जागां गेला तरी उपासे मरेना ! याचें चित्त धरून जें काय देईल तें त्याचे समाधानानें घेणें. दहाजण तुजला बरी ह्मणतील छत्रपतीही सुखी होईल. [लेखांक ३०५] ..... ७ पवार. श्रीभार्गवराम. श्रीमत् परमहंस क्षत्रियकुलावतंस रणधीर उदाराम पवार तुझीं पत्र लिहिलें तें माघ वद्य पूर्णिमेस पावलें कान फुंकून उपदेश करिताती. म्यां तुह्मां दोघां बंधूंस अंतरींच उपदेश केला. तुमचें मन तुझांस साक्ष देत अ- सेल. तुझी उभयतां माझे विषयीं व कृष्णाजी व लिंगोजी हवालदार तुझी माझे भजनीं असिलेंत तरी महाड आलेंसें समजा. दिगंतीं तु- मची कीर्ति होईल. छत्रपति तुह्मांवरी संतोषी होतील. तुमच्या लष्करांत फितवा होऊं न पावे. मी वेडासा जोगी समस्तांचा (आहे). माळशि- रसच्या सनदा राजा व तुझीं जरी पाठवाल तरी मी गोमूत्र घेईन आणि क्षौर करीन. आपण आजिपर्यंत गोमूत्र घेतले असेल तरी तुझ्या ग ळ्याची आण असे. हल्लीं मेरूचें देऊळ होतें व हल्ली खांबटकीचे तळ्याचे काम होतें. राजाच्या पुण्येकरून भुलेश्वराचें देऊळ होईल. जरी तुमच्या चित्तास नये तरी एखादे दिगंतरास जाईन. तुमचें तुह्मी जतन करा. मी कांहीं तुमचें नेणार नाहीं. हें राज्य टाकून जिकडे माझी माती निरवली असेल तिकडे जाईन. तुझीं सविस्तर फत्तेचें वर्तमान