पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ करील बाई, तुमचे नेमास बहुत दिवस जाले, आणि वचनाप्रमाणें दहा हजार रुपये पाठविले नाहींत. मेरूचे देवालयाचें काम कांहीं सामान्य नव्हे. चार हजार रुपये अंतोबा नाईकाकडून देविले आहेत झणून लिहिलें ते प्रविष्ट होतील. वरकड आजिवर आशीर्वादपत्र पाठविलें नाहीं झणून लिहिलें, तरी सर्वकाळ आशीर्वाद तुमचें कल्याण व्हावें हें इच्छित असों पत्र लिहावें तर मागें प्रसाद चादर व दुलई अंगावरील पाठविली त्याचा जाब न पाठविलांत. याजकरितां पत्र आजिवर न लिहिले. याजउपरी साहा हजार रुपये उदकदत्त वागूदत्त पैकीं राहिले ते पाठवून दिले पाहिजेत. ह्मणजे सुदाम्याचे पोह्यासारखें ते होईल. सहस्र हातांचा देणार आणि दो हातांचे माणस किती घेईल ? तुझें बरें व्हावें याजकरितां तुमचे रुपये घेऊन देवकार्यास लावावे. येरवी आझांस कांहीं रुपये मिळतील कीं न मिळतील, वरकड देतील कीं न देतील, हें चित्तांत आणणें तुजला लेकी हाटली ते खरीच आहेस. तुझें बरें व्हावें याजकरितां लिहिलें. पुर्ते चित्तांत आणून रुपये साहा हजार पाठवणे. झणजे पैके यथेष्ट मिळतील. जाणीजे. सोरठप्रांतें जात्येस तेही भूमी तुज पादाक्रांत होतील. भेटीचे समयीं बोलिली होतीस जे, जातांच वस्त्रे पाठवून देतों आणि नेमास कां चुकत्येस ? नये तुझ्या चित्तास, तर आणखीकडे बावा भीक मागावयास जा ऐसें स्पष्ट लिहिणें, देवास देऊं करावें आणि ठेवावें है उत्तम नसे. जाणीजे. [ लेखांक ३०४] ● श्री. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं - मननिर्मल गंगाजल गंगाजान्हवीसमान मुक्ताबाई दाभाडी यांस आज्ञा केली ऐसीजे: - आमचें वचन मानित्येस याचां फलात्कारही होतो. तुझे सुनेस मानबाई ( तान ? ) पुत्रही जाहला. आझी सराटेचे आसनावरी जेजुरीस सव्वा महिना बैसिलों. येस पाटील गांवांत बसिला.