पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८३ ५ गायकवाड. श्री. [लेखांक ३०२] पिलाजी गायकवाड याणें मळोजीस हाटलें जे, तुझी आह्मी सोयरे होऊं. त्याजवर मळोजी बोलिला जे, पुत्र व कन्या बाबांचे प्रसादाचीं आहेत. सोयरीक बाबा देणार. आमचे स्वाधीन नाहीं, व खंडेराव दा- भाडे यांणीं मळोजीस सांगितलें जे, पिलाजी गायकवाड आमचा बार- गीर, त्यास सोयरीक न करणें. ऐसें झालें. त्यावरून पिलाजी गायकवाड यांणीं आझांस पत्र लिहोन कारकून आझांकडे पाटविला जे, बावा तुझी भेट द्याल तर हत्ती भरून रुपये देईन. दोन हजार सध्यां पाठ- विले आणि लिहिलें जे, मळोजीचे मुली आमचा पुत्र खंडेराव यास देवणें. त्यावरून आह्नीं मळोजीस लिहोन सोयरीक देविली. हे सोयरीक जाली ह्मणून पोरास पोट भरावयास जागा जाहला. ऐसें असोन आ- झांसीं नष्टपणा धरितो, उदकदत्त पाठवीत नाहीं. जो मंत्र दिला तो पाण्यांत लिहोन बुडविल्यास काय होईल तें तुझांस कळों येईल. वेड लागेल ह्मणून खोंचून तुझांस लिहिले आहे. ६ दाभाडे. [ लेखांक ३०३] श्री. मननिर्मल गंगाजल मातुश्री उमा मुक्ताबाई दाभाडी यांसी आज्ञा केली ऐसीजे: – तुमचें संतोषाचें वर्तमान पत्र वैशाख वद्य १० प्रविष्ट होऊन जैसें धुरूचे सापल मातेनें धुरूस लाथ मारली होती, तो तप- चर्येस जाऊन अढळ पद परमेश्वरें दिल्हें, त्याचे मातेस संतोष जाला; तैसें तुमचें फत्तेचें पत्र ऐकोन समाधान जालें. तुमचे निष्ठेनुरूप श्री फत्ते

  • हे पत्र कोणास लिहिले त्याचा नामनिर्देश नाहीं. तथापि हें पिलाजी गाय-

कवाडास अनुलक्षून असल्यामुळे ते गायकवाडांच्या नांवाखाली घातले आहे.