पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ ३ भोंसले अक्कलकोटकर. श्री. [ लेखांक ३०० ] सहस्रायु चिरंजीव विजयीभव धर्ममूर्ति फत्तेसिंगबावा यांसी आज्ञा ऐसीजे:- बाबुजी नाईक यासी तुझी मैत्री करूं नका. हा केवळ पंचमहापातकी आहे. याच्यानें कांहीं तुमचें बरें करवत नाहीं. जा- तीचा सराफ, अपेशी आहे. तरी याची मैत्री तुझीं तोडून देणें. आमची त्याची गोडी नाहीं. ऐशास तुझांस आह्नीं लिहिले आहे. तरी या गोष्टी चित्तामधीं ठेवून मैत्री तोडून टाकणें. मैत्री केल्यास पुढें कळेल. - ४ जाधवराव [ लेखांक ३०१] ॥ श्री भार्गवराव ॥ सहस्रायु चिरंजीव विजयीभव पिलवा जाधवराव यांसी आज्ञा केली ऐसीजे:-आझी जेजुरीहून गतवर्षी तुमचे घरास आलों भांडून झगडून पांच हजार रुपये दिल्हे ते श्रीस प्रविष्ट जाहले. पांच वर्षे जाहलीं. ती वर्षांचें वर्षासन रुपये बाराशें ऐसे पांच वर्षांचे रुपये भुलेश्वरास सत्वर पाठवून देणें. तुमंचे अंगणाहून भुलोबाचें देऊळ काड्यामुड्याचे जाहलें तें दिसत असेल. तुझी माझी गडी आज कालची नाहीं. बहुत दिवसांची कोंकणांतील आहे. रुपये मागतों ह्मणून टाकूं नको. पैके दिल्हे आहेत देवें व मागतोही देव दिल्यानें काय होईल आणि न दिल्याने काय होईल, तर तुझी जाणतच आहां. तुजला सर्व कळतच आहे. भुलोबाचें तळें अत्रीचे हातचें होतें, तेंही दुरुस्त [केलें.] ... [ ह्या पुढील बंद गहाळ झाला आहे ].