पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८१ वृद्धि होये. यांत व्यतिपात, वैधृत, ग्रहणें जाऊन…….…….श्री कार्यास काय [राहणार?]. वीस लक्ष रुपये लागले. आतां कामें मो- ठमोठालीं धरिलीं आहेत. तरी पांच हजार पैकीं आजि तीन हजार रुपये देणे. दोन हजार पुढें आगोटीस देणें. श्रीचरणीं निष्ठा अ- सलीयानें......तुझी फत्ते होत्ये तें कळों येईल. पाटाव पासोडी जशी राणोजी शिंद्यानें दिले, त्याप्रमाणे पासोडी ऊंच, ताडपत्री दोन, शंभर रुपये [किंमतींची] सोंवळ्याची देणे. केसोबाबराबर आपलों माणसें देऊन पाठवणे. [ लेखांक २९९ ] श्री. श्रीमत् परमहंस स्वामीं यांहीं सहस्रायु चिरंजीव मल्हारजी जडभरत होळकर यांसी आज्ञा केली ऐसीजे:- आह्मी तुमचे घरास आलों आणि तुझी खोलींत जाऊन एकांत करीत बैसलेत. आमचा कर्णा ऐकोन न आलेत. हें तुझांस विदित नाहीं. तुझी ह्मणजे आमचे निजभक्त तुझांपासून अंतर न पडावें तें पडिलें! तेथून आह्मी जगतापाचे घरास गेलों. त्यांणीं पूजा केली. तुमचे घरास न आलों ह्मणून लोक निंदा करतील, याजकरितां वाफगांवास तुमचे स्थळास गेलों. तुमचे बायकोस सांगोन पाठविलें जें, द्रव्याखेरीज काय द्याल तें घेऊं; ऐसें असेल तर तुमचे घरास येतों. त्यांणीं मान्य केल्यावर तुमचे घरास गेलों. तुमचे बायकोनें अंगावर पासोडी घातली. तिची निष्ठा देखोन बहुत संतोषी जालों. तुझांपासून अंतर पडिलें, परंतु आह्मांपासून तुमचे ठायीं अंतर पडिलें नाहीं. मागील उदकदत्तपैकीं तुझांकडे रुपये ८०० राहिले आहेत, ते शंभुज- वळ देणें. अनमान न करणें. येंदा कांहीं तुझांजवळ मागत नाहीं. मागील उदकदत्त न ठेवणें. -