पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ मिरासदार खोत नव्हे. वरकड सारे कुणबावेकरी तैसा आपण शेतें कुणवाव्यानें करितों. मुलना यांणीं कांहीं आपणास शेतें मशिदीचीं सोडून देणें ऐसें मुजा- हिम जाहले नाहीं. जर शेतें मशिदीचीं सोडून देणें ऐसे होईल तरी आपण तींच शेतें कशास करितों? कुणबावा करणें तेव्हां दुसरीं शेतें करितों. आंमा मुलना यांणीं हटकिलें नाहीं. मशिदीची शेतें सोडून देणें ऐसें याणीं हटकिलें, आणि आपण जोरावारीने शेतें करितों, ऐसा शाबीद होऊन आपणावर खरें जाहले तर आपण सरकारची गुन्हेगारी रुपये ४०० चारशें देईन. हा लिहून दिला कतवा सही छ० २१ सावान. शाविदी. बहिरोवा नाईक पोतदार. येसाजी सूर्याजी चव्हाण कोंकणराव देसाई मामले हमजाबाद. १. सुभा १. " ह्याप्रमाणें स्वामींस अनंत प्रकारें त्रास पोहोंचू लागला. त्यांतच पाथरवटा- संबंधानें राजपुरीचे थोरले खान ह्यांचा व स्वामींचा कांहीं बेबनाव झाला. तेव्हां हवशांच्या राज्यांत राहणें आतां योग्य नाहीं असें वाटून, त्यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांस एक यादी पाठविली. ह्या यादीमध्ये त्यांनी हवशाच्या उपसर्गाचं वर्णन लिहिले आहे. ते वाचून त्या वेळच्या स्थितीचें चित्र डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभं राहतें. ही यादी फारच महत्त्वाची आहे. ती येणेंप्रमाणे:- तें यादी दास्तन. 66 गतवर्षी हत्तीमुळे गर्गशा आह्मांवर सिद्दी साद याणें करून श्रीस्थळी उप- द्रव दिला. तो तुझांस परस्परें विदित झालाच आहे. त्या दिवसापासून आह्मां- जवळ घसघस लावून आजिवर कष्टी करीतच आहे. हल्ह्रीं गांवामध्ये मुलना पेटेंकर यास शिखवून, त्याणें बापू जोशी यांसीं घसघस 'आपलीं शेतें भातें वतनीं तुम्ही करितां हे आपली द्या. नाहीं तर सुभा चला.' असे सांगून, आपण अंजनवेलीस जाऊन बापू जोशी यांस दहा रुपये मसाला करून देऊन मनमुभी आरंभिली जे, 'मुलनाचीं शेतें वतनीं तुझीं कां करितां ?" बापू जोशी बोलिला जे, 'हैं शेतें पुरातन आपलीं आहेत.' त्याजवर कतवा लिहून घेतला ! आणि मनसुभी लटकी करून बापू जोशी याणें कतवा लिहून दिला आहे. त्याजवळ रुपये चारशें मागतों. आह्मांस पत्र लिहिले आहे जे, 'तुह्मी घडींघडीं