पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० मध्येंच तुमचे कारकून आपली माणसें पाठवून आमचे माणसांस बाहेर घालितात. तुज आह्मांमध्यें तूट पाडतात. तुमचे माणसाबराबर तुझांस कागद लिहिला होता जे, बाई, तुजला देव नको; शिंपी व्हावें असतील तर सूर्यासन्मुख उभी राहोन बोल, जे तुमचे रुपये बद्दल असले तर आपण कुरुक्षेत्रींचे वृद्धीनें देईन ऐसें ह्मण. ह्मणजे कुळां- जवळ तुझांजवळ रुपये मागत नाहीं. हल्लीं देवजी जालूद रायाकडील पाठविला. त्याणें सांगितलें जे, बाई बोलिली जे मजवर बाबांदीं गोमूत्र कां टाकिलें आहे ? माझा अन्याय कांहीं नाहीं. बावांचे माणसास मध्ये चाकर दबवितात. हल्लीं तुहीं आपलीं कुळें घेऊन जा. अगर रुपये त्यांपासून आपले घेणे. जासूदही आपला वसुलास दिल्हा. हें रायाचे जासुदानें सांगितल्यावर संतोषी जाहलों बरें, आठरों रुपये तुझांकडे येणें, त्याचा फारसा विषय नाहीं. तुमचे बोलें गोमूत्र घेऊन हल्लीं जासूद पाठविला आहे. याजबराबर तुझांकडील झाडून आठरों रुपये पाठवून देणे. २ होळकर. [ लेखांक २९८ ] श्री. सहस्रायु चिरंजीव जडभरत बोधला मल्हारवा यास आज्ञा ऐ- सीजे:- ज्या दिवसापासून तुजला श्रीनें प्रथम भेट दिली त्या दिव- सापासून तुझे मनीं साक्ष आलीच असेल. मी सदेह होऊन कोणास प्रसाद देत नाहीं आणि तुला सदेह होऊन प्रसाद दिला. मीं तुजला झटलें, पांढरी सकलाद पाठवून दे. त्यास तूं अनमान केलास. त्यास तुजला प्रसाद पांढरी सकलाद पाठविली आहे. हें वज्रकवच अंगावर घेत जाणे. हे कोणास देशील तर माझी आण असे. तुझीं पांच हजारांचें वाग्- दत्त धारादत्त उदक घातले, त्यास लौकर न दिल्यानें कुरुक्षेत्राचे वृद्धीनें