पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७९ न वाटें न जाणें नाहींतर तुमचा आमचा स्नेह राहणार नाहीं. ऐसीं ताकीदपत्रे देऊन जे गोष्टीनें याची मुक्तता होय तो पदार्थ अगत्य करणे. अनमान न करणें. ● [लेखांक २९६] श्री. श्रीमंत परमहंस स्वामी यांहीं - • गंगाजान्हवीसमान मातुश्री काशीबाई भोंसली यांसी आज्ञा केली ऐसी जे: – सारी पृथ्वी आह्मांस ध्याते आणि हजारांचे हजार पैके धाडून देतात. सौभाग्यवती विरुबाई वर्षामध्ये चार वेळां आमचे भेटीस येतात. हे तुझांसही परस्परें विदितच आहे. आमचा विश्वासघात करून शिंपी माळशिरसचे पेटेंतून पैसे घेऊन तुझे गांवांत जाऊन राहिले आहेत. त्याजकडे गोविंद केशव गेला आहे. तरी हिशेबाप्रमाणे त्याच्या मुसक्या बांधून त्याजपासून पैके घेऊन आह्मांकडे पाठवून देणें ह्मणजे आझी पोटभर गोमूत्र घेऊं, आणि तुजला तुझ्या पुत्रास आशीर्वाद देऊं. त्याजकडील रुपये पाठविल्यास तुझीच भिक्षा पावली ऐसे संतोष [ होऊं ]. ते कांहीं स्वर्गास तुज कामास येणार नाहीं? स्वर्गी वास करणे तुझेच हालीं आहे. हे गोष्ट न करा तरी तुजवर गोमूत्र टाकून खांसा आह्मी तेथें येऊं. तेव्हां संकट पडोन त्याजकडील पैका तुजला [ द्यावा लागेल. हे आज्ञा?]. [लेखांक २९७ ] श्री. गंगाजान्हवी समान मातुश्री काशीबाई यांसी आज्ञा:- मी साधुसं- ताची पायधूळ आहें. बाई, गतवर्षी मज कागद तुझीं पाठविलांत जे, बाबा, तुमचे आशीर्वादें माझा लेक रघुजी भोंसले सुखरूप येऊं द्या हाणजे मी स्वामींचे भेटीस येईन. त्यास तुझेच पुण्यें चिरंजीव रघुजी भोंसले सुखरूप घरास आले. तुमची याची भेटी जाहली. त्यावर कांहीं तुमचा कागद आला नाहीं. कर्जदार कुळांकडे माणसें पाठवितों, त्यास -