पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निसचत मानाजी खलदकर. १०० आपाजी मालवदकर. ३७५ खुद्द मानाजी. २६ चिमा तेली. ५०१ पैकीं वसूल रुपये. २२ आपाजी मालवदकर. ६ चिमा तेली. बाकी रुपये ४७३ तेरीज २३३ ७०६ २७८ कित्ता कुळें. ७५ अंबरा वाणी ७५ शिवाजी महाडीक १०३ मल्हारी बाकरा २५३ पैकीं वसूल अंबरा वाणी २० बाकी २३३. एकूण सातरों सा रुपये त्याकडे मुद्दल आमचें येणें. त्यासी हे रुपये तुझीं पाठवावे हाणजे कुळें व कतचे पाठवून देऊं. सातरों सा रुपये मुद्दलच तुझांकरितां घेतों. काय निमित्त कीं, तीही पेठ आमचीच. दी पेठ औरंगाबाजेसारिखी जास्त वसवणे. आपली कुळे आमचे रुपये पाटवून घेऊन जाणे हाणजे नांव तुमचेंच आहे. यानंतर चिरंजीव नारो शंकर याणें वराडांत अकोटच्या अविधाकडेस सेवा केली. तीन चार वर्षे होते. सांप्रत त्याणें नारो शंकर याजवर तुफान करून सात सहस्र रुपये दंड ठराविले. त्यांपैकी तीन हजार रुपये घेतले. बाकी चऊ हजार रुपयांबद्दल जामिनाचे घरीं चौकी बसविली. कांहीं खाल्ले- पिल्ले नसतां नाहक याजवर दंड घातला आहे. तर याचें श्रीस बहुत अगत्य आहे ह्मणून तुझांस लिहिले आहे. तर अकोटच्या अविवास व जमीदारास ताकीदपत्रे लिहून देणें कीं, वाजवी त्याचे अंगीं पैसा नसतां काय समजोन ब्राह्मणास कष्टी करितां ? याउपर त्या ब्राह्मणाचे